Crime News : एवढा क्रुरपणा येतो कुठून? लहान भावा-बहिणींना घरात घुसून जिवंत जाळलं, घटनेने देश सुन्न
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
घरामध्ये घुसून एम्समध्ये काम करणाऱ्या एका गार्डच्या दोन निष्पाप मुलांना जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Crime : घरामध्ये घुसून एम्समध्ये काम करणाऱ्या एका गार्डच्या दोन निष्पाप मुलांना जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घृणास्पद घटनेनंतर परिसरात घबराट आणि संतापाची लाट उसळली आहे.
12 आणि 8 वर्षांच्या मुलांना जाळलं
मृत मुलांची ओळख अंजली (12) आणि अंश (8) अशी झाली आहे. शाळेतून परतल्यानंतर दोन्ही भावंडे त्यांच्या घरी असताना अज्ञात गुन्हेगारांनी ही भयानक घटना घडवली. ही घटना पाटण्याच्या जानीपूर पोलीस स्टेशन परिसरातील शोभा देवी आणि लालन कुमार गुप्ता यांच्या घरात घडली. लालन कुमार गुप्ता पाटणा एम्समध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात आणि घटनेच्या वेळी ते कामावर होते.
advertisement
परिसरात खळबळ
घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. स्थानिक लोकांमध्ये आणि पीडित कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या घटनेनंतर प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे आणि न्यायाची मागणी केली आहे. अशा घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात असं म्हणत नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे.
पोलिसांचा परिसराला घेराव
advertisement
माहिती मिळताच जानीपूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनेचे गांभीर्य पाहून फुलवारी शरीफचे डीएसपी-2 देखील घटनास्थळी पोहोचले आणि ते स्वतः तपासावर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी परिसराला घेराव घातला आहे आणि संशयितांचा शोध घेतला जात आहे.
सध्या या क्रुर गुन्ह्यामागील हेतू स्पष्ट नाही. शत्रूत्व, मालमत्तेचा वाद अशा वेगवेगळ्या एँगलने पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
Location :
Patna,Bihar
First Published :
July 31, 2025 8:25 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : एवढा क्रुरपणा येतो कुठून? लहान भावा-बहिणींना घरात घुसून जिवंत जाळलं, घटनेने देश सुन्न