स्वप्नील गोस्वामी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सोमवारी रात्री स्वप्नील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लखन चायनीज सेंटर परिसरात होता. यावेळी तिथे आलेल्या काही जणांनी स्वप्नीलला दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाली. ही घटना घडल्यानंतर त्याला तातडीने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता.
advertisement
रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी स्वप्नीलला मृत घोषित केलं. स्वप्नीलची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र स्वप्नीलचं काही तरुणांसोबत भांडणं झालं होतं. यानंतर त्यांनी स्वप्नीलला दगडाने मारून गंभीर जखमी केलं. यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी संशयाच्या आधारे एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही दिसून आलं का? याचा शोधही पोलीस घेत आहे. या घटनेचा सविस्तर तपास जरीपटका पोलिसांकडून केला जात आहे.
