TRENDING:

Bharat Jadhav : ''वाल्मिक कराडसारखी...'' नवी मुंबईतील भाजप नेत्याने पोलीस ठाण्यात विष प्राशन केलं

Last Updated:

Navi Mumbai BJP : नवी मुंबईतील भाजपच्या नेत्याने पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भरत जाधव असे त्यांचे नाव असून नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई/रायगड: नवी मुंबईतील भाजपच्या नेत्याने पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भरत जाधव असे त्यांचे नाव असून नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. रायगडमधील कर्जत पोलीस ठाण्यात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. सध्या जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भरत जाधव यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याआधी एक व्हिडीओ रिलीज केला असून धक्कादायक आरोप केले आहेत.
News18
News18
advertisement

माजी नगरसेवक असलेले भरत जाधव हे व्यावसायिक देखील आहेत. आपण प्रचंड मानसिक तणावात असल्याचे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले. वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती इतकी वाढत चालली आहे की, तुम्ही प्रामाणिकपणे कामच करु शकत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मी प्रामाणिकपणे व्यवसाय करत होतो, त्यामध्ये मला त्रास झाला. 25 वर्षांच्या राजकारणात इतर राजकारण्यांप्रमाणे मी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले, असे कोणीही सांगून दाखवावे असेही त्यांनी म्हटले.

advertisement

व्हिडीओत व्यावसायिक तणावाबाबत बोलताना भरत जाधव यांनी म्हटले की, चार-पाच वर्षांपूर्वी कर्जत-जामखेड तालुक्यात बिल्डींगचं काम सुरु केलं. रमेश आसबे, युनुस सय्यद, बेबीचंद धनावडे आणि मी. रमेश आसबेचं आणि सचिन घायवळ व निलेश घायवळचा काय वाद झाला मला माहिती नाही. मात्र, अडीच-तीन वर्षे त्यांनी दहशतीच्या जोरावर बिल्डींगचं काम बंद पाडले आहे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोन-तीन गाड्या साईटवर येतात, 30-40 पोरं उतरतात. त्यामुळे या बिल्डींगचं एकही बुकिंग होत नाही. आज जवळपास तीन-चार कोटी टाकून, बँकेचे कर्ज घेऊन मी नुकसान सहन करत आहेत. सहन होत नाही, अशी ही गोष्ट झाली आहे. बँकेचे कर्ज आणि व्याज हे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

advertisement

जामखेडच्या भूम तालुक्यात एक प्लांट आहे. हे लोक आपल्याला त्रास देतील, हे मला माहिती आहे, म्हणून मी तिकडे काम सुरु केले. एका कामात बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आगमने यांना पार्टनर म्हणून घेतलं, त्यांनी 90 लाख रुपये लावले आणि दहा-बारा महिन्यांत 60 लाख रुपये नफा घेतला. पाच-दहा लाखांवरुन भांडणं, मारामाऱ्या केल्या, माझ्या दुसऱ्या पार्टनरला मारहाण केली. मी म्हणालो, देऊन टाका, भांडण नको. त्यानंतर जीएसीटीची बिलं देताना त्यांनी बोगस बिलं दिली. त्यामुळे आमच्या कंपनीला त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले.

advertisement

5 लाख रुपये घेऊन भाजयुमोचा जिल्हा सचिव केलं...

व्हिडीओत भरत जाधव यांनी म्हटले की, नरेंद्र झुरानी प्रकरणातही असेच घडले, हे प्रकरण खूपच विचित्र आहे. मी नवी मुंबईत ज्याला लहानाचा मोठा केला, ज्याला नावारुपाला आणला, ज्याला समाजात वावरायचं शिकवलं, कामं घेऊन दिली, पैसे दिले. त्याचा हिशेब करताना एका राजकीय नेत्याच्या, कधी दुसऱ्याच्या आश्रयाला जायचं. या नरेंद्र झुरानीला दत्ता घंगाळे यांनी पाच लाख रुपये घेऊन भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव करण्यात आले, काहीही संबंध नसताना. त्यांना राजाश्रय दिला, व्यवसायात पार्टनर झाले. त्यांचा काय व्यवसाय आहे माहिती नाही पण कोट्यवधींच्या जमिनी ते विकत घेत असल्याचा आरोप जाधव यांनी व्हिडीओत केला.

advertisement

दत्ता घंगाळेची बायको कॉलर करून धमकावते...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

भरत जाधव यांनी आपल्यावर बेतलेल्या घटना सांगताना म्हटले की, दत्ता घंगाळे यांनी मला गँगवॉरची धमकी दिली. नरेंद्र झुरानी मला फसवत आहे, हे त्याच्या कुटुंबीयांना माहिती आहे. दत्ता घंगाळेची बायको माझी कॉलर पकडून मला धमकावते. बदनामी करायला, टार्गेट करायला मर्यादा असते. विशाल डोळस, अभिलाष मॅथ्यू, सचिन शिंदे, अनिकेत हे मला भररस्त्यात शिव्या देतात, त्रास देतात. त्यांच्या कोणत्याही आर्थिक विषयात मी कधीही पडलेलो नाही. सरकारने नरेंद्र झुरानी यांनी केलेल्या कामाची आणि वॉर्ड नंबर 108 मधील केलेल्या कामांची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. कर्जत-जामखेड तालुक्यात मी कोट्यवधी रुपये टाकून जमीन घेतली. यामध्ये अनेकांनी कमिशन घेतलं. दत्ता पवार, रुपेश पवार यांनी झाडाचे आणि रस्ता काढून देण्याचे पाच-सात लाख रुपये घेतले. आता माझ्याच जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला. जेणेकरुन मला जमीन विकता येऊ नये, असे भरत जाधव यांनी व्हिडीओत म्हटले.

मराठी बातम्या/क्राइम/
Bharat Jadhav : ''वाल्मिक कराडसारखी...'' नवी मुंबईतील भाजप नेत्याने पोलीस ठाण्यात विष प्राशन केलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल