TRENDING:

12 मोबाईल, 12 डेबिट कार्ड,17 चेक बुक जप्त; ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचे कारनामे भिवंडीत उघड

Last Updated:

आरोपींच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 35 लाख रुपये रक्कम वर्ग झाली व त्यानंतर आरोपींनी ही रक्कम तत्काळ बँक खात्यातून काढून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे :  भिवंडी शहरातील शांतीनगर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचे कारनामे उघड  करण्यात आले आहे. या मध्ये दोन अल्पवयीन आरोपी असल्याने तिघा जणांना अटक केली असून त्यांच्या जवळून 9 मोबाईल,12 डेबिट कार्ड,17 चेक बुक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले असल्याची माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फातिमा नगर येथे काही इसम वेगवेगळ्या लोकांच्या नावाने बँक खाते उघडून ऑनलाइन फसवणूक करून त्यांचे बँक खात्यात पैसे आल्यानंतर पैसे काढून लोकांचे फसवणूक करत असल्याची पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली.त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने फातिमानगर परिसरातून अब्दुल रब अब्दुल अहाद अन्सारी ( 23 ) , आतिक अहमद अन्सारी ( 20 ), मोहम्मद बशर जकी उल्ला अन्सारी ( 20 ) यांसह दोन अल्पवयीन अशा पाच जणांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांच्या कडील बँक खात्याची माहिती राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग पोर्टल तपासणी केली असता आरोपींकडून हस्तगत करण्यात आले आहे.

advertisement

ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर झाल्याने बँक खाते फ्रीज 

बँक खात्यात भारतातील वेगवेगळ्या शहरामधील देहेरी पोलीस स्टेशन बिहार राज्य, तामिळनाडू कोईमतुर, तामिळनाडू,भिंवडी पोलीस स्टेशन राजस्थान, नारायणपुरा पोलीस स्टेशन अहमदाबाद, हिन्नूर पोलीस स्टेशन बेंगलोर कर्नाटक या ठिकाणाहून त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर झाल्याने बँक खाते फ्रीज करण्यात आल्याची माहिती मिळाली.ताब्यात घेतलेले इसम हे ऑनलाइन फसवणूक करणारे असल्याची खात्री झाल्याने त्यांच्या जवळील आठ बँक खात्याची माहिती प्राप्त झाली आहे.

advertisement

गुन्हा दाखल करून तिघा जणांना अटक

त्यानुसार आरोपींच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 35 लाख रुपये रक्कम वर्ग झाली व त्यानंतर आरोपींनी ही रक्कम तत्काळ बँक खात्यातून काढून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या पाच आरोपींविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघा जणांना अटक केली आहे.आरोपीं जवळील उर्वरित बँक खात्याची तपासणी करून फसवणूक केलेली रक्कम अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
12 मोबाईल, 12 डेबिट कार्ड,17 चेक बुक जप्त; ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचे कारनामे भिवंडीत उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल