कंवल आफताबचा अश्लिल व्हिडिओ
ऑक्टोबर महिन्यानंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींचा अशाप्रकारे प्रायव्हेट व्हिडिओ लिक व्हायची ही पाचवी घटना आहे. मागच्या आठवड्यातही अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये कंवल आफताबला आक्षेपार्ह अवस्थेमध्ये दाखवण्यात आलं होतं. 26 वर्षांची कंवल आफताब सौंदर्य, लाईफस्टाईल आणि कुटुंबासंबंधी कंटेट बनवते. कंवल आफताबने याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कंवल आफताब लाहोरमध्ये राहते आणि इस्टाग्रामवर तिचे 40 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आफताबचं लग्न टिकटॉक स्टार जुल्करैन सिंकदरसोबत झालं असून त्यांना एक मुलगीही आहे.
advertisement
मथिराचा कथित व्हिडिओ लिक
पाकिस्तानी टीव्ही होस्ट आणि सोशल मीडिया इनफ्लुएन्जर मथिरा मोहम्मदचाही एक कथित प्रायव्हेट व्हिडिओ नोव्हेंबर महिन्यात लिक झाला होता. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या 32 वर्षांच्या मथिराने याप्रकरणी एफआयएकडे तक्रारही केली होती. माझं नाव आणि माझ्या फोटोशूटमधल्या फोटोंचा गैरवापर केला जात आहे. जरा तरी लाज बाळगा, मला यापासून लांब ठेवा, अशी पोस्ट मथिराने केली होती. त्याआधी पाकिस्तानी इनफ्लुएन्जर इमशा हरमानचाही एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात ती आपत्तीजनक स्थितीमध्ये होती, यानंतर इमशाने तिचं सोशल मीडिया अकाऊंट लिक केलं.
