लाॅजवर छापा टाकला अन् 7 जणांना घेतलं ताब्यात
सविस्तर माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा येथे महामार्गालगत मोनाली लाॅज आहे. याठिकाणी महिला आणि मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. यामध्ये राहुल वसंता श्रुंगारे (रा. स्टारसिटी शिरवळ, ता. खंडाळा), रावेश शेट्टी, मोहम्मद जावेद अख्तर, दत्ता राजू देवकर, हरिष वासुदेव शेट्टी, शुभम आप्पासो घुले आणि रंजनकुमार लक्ष्मण मल्लिक (सर्व. रा. मोनाली लाॅज, पारगाव-खंडाळा) अशी आरोपींची नावं आहेत.
advertisement
पोलिसांनी 6 पीडित महिलांची केली सुटका
या लाॅजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी त्वरित दखल घेतली. स्थानिक गुन्हे शाखा सातारा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथक आणि खंडाळा पोलीस, अशी पथकं सज्ज झाली. थेट लाॅजवर पोलिसांनी छापा टाकला. छापा टाकताच वेश्यागमन व्यवसाय सुरू असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलांना ग्राहकांसाठी वेश्यागमन करण्यासाठी जबरदस्त केली जात होती. संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि 6 पीडित महिलांची सुटका केली.
हे ही वाचा : 'तो' रोज बस प्रवासात देतोय त्रास, आईला सांगितला प्रकार, पण.. अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन!
हे ही वाचा : वर्गमित्राला Reels बववण्यासाठी हवी होती साडी; पण मैत्रिणीला गमवावा लागला जीव, कोल्हापूरात घडला भयंकर अपघात!