पोलिसांनी टाकला छापा आणि...
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेला दुर्गा लाॅजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची टिप मिळाली. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशानंतर पोलिसांची काही पथकं तयार करण्यात आली. शनिवारी (16 ऑगस्ट) रात्री उशिरा लाॅजवर छापा टाकला.
3 महिलांची केली सुटका
या छाप्यात लाॅजचा मॅनेजर कल्याण अंकुश लोखंडे (वय-36, रा. पिरपिंपळगाव, जि. जालना) तर नितीन संजय साबळे (वय-19, रा. नूतन वसाहत, जि. जालना) आणि विकास राजेभाऊ काकड (वय-23, रा. सातोना, परतूर) या तिघांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर या कारवाईत 3 महिलांची सुटका करण्यात आली. आरोपींकडून मोबाईल आणि 32 हजारांची रक्कम जप्त केलेली आहे.
advertisement
हे ही वाचा : 'पत्नी सोबत राहू देत नाही', पतीने पोलीस ठाण्यासमोरच कापली हाताची नस, हा प्रकार पाहून...
हे ही वाचा : 'त्या' 3 बैलांना कुणी मारलं, बिबट्यानं की वाघानं? वन विभाग आहे कन्फूज, शेतकऱ्यांना भरलीय धडकी!