'पत्नी सोबत राहू देत नाही', पतीने पोलीस ठाण्यासमोरच कापली हाताची नस, हा प्रकार पाहून...

Last Updated:

'पत्नी सोबत राहू देत नाही', म्हणून चिडलेल्या नवऱ्याने पोलीस स्टेशनसमोरच जीव देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने पोलीस स्टेशनच्या दारात उभे राहून...

Satara Crime News
Satara Crime News
सातारा : 'पत्नी सोबत राहू देत नाही', म्हणून चिडलेल्या नवऱ्याने पोलीस स्टेशनसमोरच जीव देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने पोलीस स्टेशनच्या दारात उभे राहून धारदार ब्लेडने स्वतःच्याच डाव्या हातावर वार केले. जास्त रक्त वाहू लागल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात संबंधित पतीला दाखल केले आणि त्याचे प्राण वाचवले.
हाताची नस कापून पतीचा जीव देण्याचा प्रयत्न
ही धक्कादायक घटना साताऱ्यातील शाहुपुरी पोलीस ठाण्यासमोर घडली. 31 वर्षीय नीलेश अरुण एटांबे हा पेरले (ता. कराड) येथे राहतो. त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. त्यामुळे त्याने हाताची नस कापून जीव देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हा प्रकार त्याने पोलीस ठाण्याच्या दारात केला.
 पोलिसांनी तातडीने नेलं रुग्णालयात
नीलेश पोलीस ठाण्यासमोर असलेल्या झेंड्यासमोर आला. त्याने आपल्याजवळी ब्लेड काढले आणि डाव्या हाताची नस कापली. त्यामुळे त्याच्या हातातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यावेळी ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले आणि त्याचा जीव वाचला.
advertisement
पतीने पोलिसांनी दिलेलं कारण धक्कादायक
पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस चौकशीत नीलेशने सांगितले की, माझी बायको मला सोबत राहू देत नाही. त्यामुळे मी हाताची नस कापून जीव देण्याचा प्रयत्न केला. शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
'पत्नी सोबत राहू देत नाही', पतीने पोलीस ठाण्यासमोरच कापली हाताची नस, हा प्रकार पाहून...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement