संशयाचं भूत डोक्यात शिरलं, पत्नी माहेरी जाताच मित्राला संपवलं; 2 भावांच्या कृत्याने इचलकरंजी हादरलं!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
पतीसोबत वाद झाला म्हणून पत्नी मुलांना घेऊन माहेरी राहण्यासाठी गेली होती. पतीला भलताच संशय आला. त्याने कामानिमित्त कायम सोबत राहणाऱ्या...
इचलकरंजी : पतीसोबत वाद झाला म्हणून पत्नी मुलांना घेऊन माहेरी राहण्यासाठी गेली होती. पतीला भलताच संशय आला. त्याने कामानिमित्त कायम सोबत राहणाऱ्या मित्रावर संशय घेतला. त्याला वाटलं की, मित्रच माझ्या बायकोच्या मागे लागल्यामुळे ती घर सोडून, मुलांना घेऊन माहेरी गेलीय. त्यामुळे मित्राबद्दलचा राग पतीच्या डोक्यात होता. शेवटी भावाची मदत घेतली आणि घरात असलेला दगडी वरवंटा डोक्यात घालून त्याचा जीव घेतला.
दोघा भावांनी मिळून मित्राचा केला खून
विनोद अण्णासाहेब घुगरे (वय-32) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संतोष दशरथ पागे (वय-38) आणि संजय दशरथ पागे (वय-36) या 2 भावांनी विनोदचा खून केला केला आहे. हे तिघेही गल्ली नं साडेतीन, गणेशनगर, शहापूर येथे राहतात. त्या दोघा भावांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीची बहीण वनिता सचिन बोरगे यांनी फिर्याद दिली आहे.
advertisement
घरात बोलावून डोक्यात घातला वरवंटा
पोलिसांकडून समोर आलेली माहिती अशी की, विनोद, संतोष आणि संजय हे तिघेही दारूडे होते. तिघे मिळून इलेक्ट्रिशनचे काम करत होते. संतोषचं लग्न झालेलं होते. पण विनोद आणि संजय हे दोघे अविवाहित होते. संतोषचे बायकोसोबत सतत वाद होत असतं. त्यामुळे की काही महिन्यांपूर्वी मुलांना घेऊन, घर सोडून माहेरी निघून गेली. संतोषला संशय येऊ लागला की, विनोद बायकोच्या मागेला लागला होता. त्यामुळे ती माझ्याबरोबर भांडण करून माहेरी निघून गेली आहे. या कारणांवरून दोघांच्यात वादही झाला होता.
advertisement
अखेर पोलिसांकडून दोघांना अटक
याच विषयांवरून शनिवारी रात्री साडेअकरा वाजता संतोषच्या घरी पुन्हा दोघांच्यात वाद झाला. त्यावेळी संतोष आणि संजय या दोघांनी मिळून विनोदच्या डोक्यात वरंवटा घातला. या हल्ल्यात विनोदचा जागीच मृत्यू झाला. त्याचा खून केल्यानंतर दोघा भावांनी घराची कडी लावली आणि घराबाहेर पडले. पोलिसांनी दोघा भावांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 7:27 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
संशयाचं भूत डोक्यात शिरलं, पत्नी माहेरी जाताच मित्राला संपवलं; 2 भावांच्या कृत्याने इचलकरंजी हादरलं!


