advertisement

'या' चुकांमुळे कमी होतं बाईकचं मायलेज! लगेच सुधारा आपल्या सवयी

Last Updated:
पेट्रोल महाग होण्याच्या काळात बाईकचं चांगलं मायलेज हे आवश्यक आहे. टायरमध्ये योग्यहवा, योग्य वेळी सर्व्हिस आणि इंजिन ऑइल बदलणं खुप महत्त्वाचं आहे. चुकीचा गियर, हाफ क्लच आणि वारंवार ब्रेक लावल्याने फ्यूल जास्त खर्च होते.
1/5
आजच्या काळात पेट्रोलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. अशावेळी प्रत्येक बाइक चालवणाऱ्याला वाटतं की, आपल्या गाडीने चांगलं मायलेज द्यावं. मात्र अनेकदा असं दिसतं की, नवीन बाइक काही महिन्यानंतर कमी अॅव्हरेट देऊ लागते. जास्तीत जास्त लोक याचं खापर कंपनीच्या डोक्यावर फोडतात. मात्र खरं कारण रोजच्या काही लहान-लहान चुका आहेत. यासोबतच योग्य देखभाल न केल्याने असं होतं. योग्य वेळी या गोष्टींकडे लक्ष दिलं तर मायलेजमध्ये बरीच सुधारणा होऊ शकते.

2/5
टायर प्रेशरकडे लक्ष ठेवा : सर्वात आधी टायर प्रेशरविषयी बोलूया. टायरमध्ये हवा कमी असेल तर इंजिनला बाईक पुढे नेण्यासाठी जास्त ताकद लावावी लागते. यामुळे फ्यूल जास्त लागते. यामुळे आठवड्यातून एकदा टायर प्रेशर तपासणे आणि गरज पडल्यास हवा भरणे खुप गरजेचे आहे.

3/5
योग्य वेळी सर्व्हिस न करणे : दुसरे कारण म्हणजे योग्य वेळी सर्व्हिस न करणे. एयर फिल्टर आणि इंजिन ऑइल घराब किंवा जुं झालं तर इंजिनची कार्यक्षमता कमी होते. ज्यावेळी इंजिनला परिपूर्ण हवा मिळत नाही किंवा ऑइल योग्य प्रकारे लुब्रिकेशन करत नाही. तर पेट्रोल जास्त लागते. यामुळे योग्य वेळी सर्व्हिसिंग आणि योग्य वेळी ऑइल बदलल्याने बाईकचा परफॉर्मेंस आणि मायलेज दोन्ही चांगले राहते.

4/5
चुकीच्या गियरचा वापर : चुकीच्या गियरचा वापर केल्याने मायलेज कमी होऊ शकतो. कमी वेगाने जास्त गियर किंवा जास्त वेगाने कमी गियर वापरल्याने इंजिनवर ताण वाढतो. इंजिन सुरळीत चालण्यासाठी नेहमी तुमच्या वेगानुसार गियर बदला.

5/5
वारंवार ब्रेक लावणे : ट्रॅफिकमध्ये अर्धा क्लच दाबून चालणे आणि वारंवार ब्रेक लावून अचानक वेग वाढवल्यानेही फ्यूल वापर वाढतो. यामुळे क्लच प्लॅट लवकर घासतात आणि मायलेज कमी होते. चांगल्या मायलेजसाठी 40-50 किमी/ताशी स्थिर वेग राखणे फायदेशीर मानले जाते. जर जास्त वेळ थांबावं लागलं किंवा सिग्नल असतील तर इंजिन बंद करणे शहाणपणाचे ठरेल. नियमित देखभाल आणि योग्य ड्रायव्हिंग सवयी तुमच्या मोटरसायकलची इंधन कार्यक्षमता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.

मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement