चोरीचा प्रयत्न फसला; एक चोर सापडला, तर दुसरा चौथ्या मजल्यावरून पडला, साताऱ्यात घरफोडीचा थरार 'असा' घडला!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
मंचर पुणे येथे राहणारे 20-21 वर्षांचे 2 तरुण साताऱ्यात घरफोडी करण्यासाठी आले. एका इमारतीमध्ये पहाटे साडेतीन वाजता शिरले. त्यांनी पहिल्यांदा इमारतीतील प्रत्येक...
सातारा : मंचर पुणे येथे राहणारे 20-21 वर्षांचे 2 तरुण साताऱ्यात घरफोडी करण्यासाठी आले. एका इमारतीमध्ये पहाटे साडेतीन वाजता शिरले. त्यांनी पहिल्यांदा इमारतीतील प्रत्येक फ्लॅटचा दरवाजांना बाहेरून कड्या घातल्या. बंद असलेले 2 फ्लॅट फोडले. सोने आणि काही रक्कम घेतली. पुढे तिसरा फ्लॅट फोडताना मोठा आवाज आला. त्यामुळे सुट्टीवर घरी आलेल्या फ्लॅटमध्ये रहिवाशी असणाऱ्या जवानाला जाग आहे. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण बाहेरून कडी होती. त्यांच्या पत्नीने खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला. तोच जवानाच्या डोक्यात लोखंडी कटावणीने एका चोरट्याने हल्ला केला.
त्या रात्री चोरी करताना 'असा' घडला थरार
इतकंच सगळं घडलं असताना भारतीय जवान थांबले नाही, ते जखमी अवस्थेत त्या चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. आजुबाजुचे लोक जागे झाले. इमारतीच्या दिशेने येऊ लागले असता दोघे चोर भांबावले. एकाला पकडण्यात यश आले. मात्र दुसरा टेरेसवर धावत गेला. तो चौथ्या मजल्यावरून भिंतीवरील पाईपच्या साह्याने खाली उतरु लागला, तोच त्याचा हात निसटला आणि खाली पार्किंग केलेल्या गाडीवर पडला. जागेवरच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
वेदान्तच्या घरातील लोक म्हणतात...
दोघा चोरांपैकी एकाचे नाव वेदान्त शांताराम आरोडे (वय-20), या तरुणाचाच इमारतीवरून पडून मृत्यू झाला. दुसऱ्याचे नाव महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय-21, दोघेही राहणार मंचर, पुणे) या रहिवाशांनी पकडून ठेवले. चोरट्यांनी 6 तोळे सोने आणि साडेपाच हजार रुपये चोरले होते. संबंधित घटना सातारा येथे महामार्गालगत असणाऱ्या बाॅम्बे रेस्टाॅरंट परिसरात वास्तू प्लाझा येथे घडली.
advertisement
चोरी करताना मृत्यू झालेल्या वेदान्तांचे कुटुंबिय म्हणतात की, "वेदान्तने पहिली चोरी मोबाईलची केली होता. तो चार-चार दिवस घरी नसायचा. त्यांच्या मित्रांची टोळी होती. ते रोज रात्री टोळक्याने घराबाहेर पडायचे. घरी नेहमी पोलिसांचा गाड्या यायच्या. आम्ही सगळेच त्याच्या कारनाम्याला वैतागलो होतो. कारण समाजात आमची बदनामी व्हायचीच."
advertisement
हे ही वाचा : संशयाचं भूत डोक्यात शिरलं, पत्नी माहेरी जाताच मित्राला संपवलं; 2 भावांच्या कृत्याने इचलकरंजी हादरलं!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 8:16 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
चोरीचा प्रयत्न फसला; एक चोर सापडला, तर दुसरा चौथ्या मजल्यावरून पडला, साताऱ्यात घरफोडीचा थरार 'असा' घडला!