T20 World Cup 2026 : पॉईटस टेबलमध्ये मोठा उलटफेर, बलाढ्य टीम वर्ल्डकपमधून बाहेर होणार, चक्रावून टाकणार समीकरण
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
तीन संघ सुपर 8 च्या शर्यतीत आहेत. पण त्यातली एक बलाढ्य टीम बाहेर होण्याची उंबरठ्यावर आहे.दरम्यान ही टीम कोणती आहे आणि बी ग्रुपच समीकरण कसं आहे? हे जाणून घेऊयात.
T20 World Cup 2026 : आयसीसी टी20 वर्ल्डकपमध्ये रोमांचक सामने सूरू आहेत. या सामन्यांमध्ये लिंबू टींबू समजल्या जाणाऱ्या संघानी बलाढ्य टीमला पराभवाच पाणी पाजल्याने सूपर 8 च समीकरण एकदमच बदललं आहे.विशेष म्हणजे ग्रुप बीच समीकरण तर खूपच किचकट झालं आहे. तीन संघ सुपर 8 च्या शर्यतीत आहेत. पण त्यातली एक बलाढ्य टीम बाहेर होण्याची उंबरठ्यावर आहे.दरम्यान ही टीम कोणती आहे आणि बी ग्रुपच समीकरण कसं आहे? हे जाणून घेऊयात.
श्रीलंका सूपर 8 मध्ये पोहोचणार
यजमान श्रीलंका संघाने आयर्लंड आणि ओमान विरूद्दचे दोन्ही सामने जिंकले आहे. त्यामुळे श्रीलंकेचे 2 सामन्यात 4 गुण आणि +3.125 नेट रनरेट आहे.आता श्रीलंकेचा पुढचा सामना सोमवारी ऑस्ट्रेलियाशी आहे.या सामन्यात जरी श्रीलंकेचा पराभव झाला तरी ते सूपर 8 मध्ये हमखास पोहोचतात. कारण त्यांचा ग्रुप स्टेजमधला
शेवटचा सामना हा झिम्बाबे विरुद्ध आहे. पण ज्याप्रमाणे झिम्बाबेने ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे ते पाहता श्रीलंका त्यांना हलक्यात घेणार नाही. पण तरी श्रीलंकेने सामना जिंकला तर त्यांचे गुण सहा होऊन ते सूपर 8 मध्ये आरामात जातील.
advertisement
झिम्बाबे कशी पोहोचणार?
झिम्बाबेने ग्रुप स्टेजध्ये ओमान आणि बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांचे 2 सामन्यात 4 गुण आणि +1.984 नेट रनरेट आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध त्यांच्या विजयाने त्यांचा सूपर 8 मध्ये पोहोचण्याचा मार्ग खुपच सोप्पा झाला आहे. झिम्बाबेचा पुढचा सामना हा आर्यलंड आणि श्रीलंकेविरूद्ध आहे. यामध्ये झिम्बाबे आर्यलंडला हमखास हरवेल आणि शेवटी जरी श्रीलंकेविरूद्ध हारली तरी 6 गुणांसह सहज सुपर 8 मध्ये पोहोचले.
advertisement
ऑस्ट्रेलिया बाहेर होणार?
ऑस्ट्रेलियाने आर्यलंड विरूद्ध सामना जिंकला होता. तर झिम्बाबे विरुद्ध सामन्याला त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.त्यामुळे त्यांचा 2 सामन्यात 2 गुणांसह +1.100 रनरेट आहे.आता ऑस्ट्रेलियाने त्यांचे पुढचे श्रीलंका आणि ओमान विरूद्धचे दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे सहा गुण होणार आहेत.पण ऑस्ट्रेलिया जिंकेपर्यंत कदाचीत श्रीलंका झिम्बाबे या दोन्ही संघाचे देखील सहा गुण होणार आहेत.अशावेळेस नेट रनरेटच्या आधारावर दोन संघ सुपर 8 मध्ये पोहोचतील. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आता एकही चूकही स्पर्धेबाहेर करू शकते.
advertisement
आता उरलेल्या आर्यलंड टीमला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण आज आर्यलंडने ओमानच्या 96 इतक्या मोठ्या धावांनी पराभव करत आशा जिवंत ठेवल्या. आर्यलंडचा शेवटचा सामना झिम्बाबेशी हा सामना जिंकूनही ते फायनलमध्ये पोहोचू शकत नाही. तर ओमान संघ तीनही सामने हारल्याने स्पर्धेबाहेर झाला आहे.त्यामुळे आता सूपर 8 साठी श्रीलंका, झिम्बाबे आणि ऑस्ट्रेलियामध्ये लढत असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2026 9:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2026 : पॉईटस टेबलमध्ये मोठा उलटफेर, बलाढ्य टीम वर्ल्डकपमधून बाहेर होणार, चक्रावून टाकणार समीकरण









