advertisement

Mumbai Local: मध्य रेल्वे विस्कळीत, एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकल उशिराने

Last Updated:

Kasara Local: ऐन संध्याकाळीच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे ऑफिसमधून सुटणाऱ्या नोकरदारांचे घरी जाताना हाल झाले आहेत.

kasara to mumbai local train traffic halted information that the express engine has broken down
kasara to mumbai local train traffic halted information that the express engine has broken down
ऐन संध्याकाळीच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे ऑफिसमधून सुटणाऱ्या नोकरदारांचे घरी जाताना हाल झाले आहेत. कसारा- कल्याण- सीएसएमटी मार्गावर प्रवाशांचे हाल झाले आहेत. कसाराकडून कल्याणकडे जाणारी लोकल आणि कल्याणहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला आहे. दोन्हीही लोकल तीन तास उशिराने सुटल्या आहेत. एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नोकरदारांना ऐन संध्याकाळच्या वेळेत उशिरा घरी पोहोचावं लागणार आहे.
सायंकाळची 05 वाजून 13 मिनिटांची उंबरमाळी स्थानकावरून सीएसएमटीकडे जाणारी लोकल आणि उंबरमाळीवरून कसाऱ्याकडे जाणारी सायंकाळची 6 वाजून 18 मिनिटांची लोकल तब्बल तीन तास ठप्प झाली होती. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर वासिंद आणि कल्याण स्टेशनवरून इंजिन मागवण्यात आली. त्यानंतर तब्बल तीन तासांनंतर कसारा- कल्याण आणि सीएसएमटी लोकल सेवा उशिराने का होईना सुरू झाली. लोकल सध्या 20 ते 25 मिनिट उशिराने सुरू आहे.
advertisement
पुन्हा एकदा प्रवाशांकडून रेल्वेच्या कामावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. दररोजच्याच लेटमार्कमुळे सध्या नोकरदार वर्ग नाराज झाला आहे.  कसारा ते कल्याण मार्गावर एका एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाली होती. जवळपास तीन ते चार तास या बंदमध्ये प्रवाशांचा वेळ फुकट गेला. त्यामुळे कसारा- कल्याण मार्गावर एकही रेल्वे पाहायला मिळाली नाही. त्यानंतर तीन ते चार तासांनी रेल्वे सुटल्यानंतर सर्वच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. रेल्वेकडून इंजिनमधला तांत्रिक बिघाड दुरूस्त केला असून 20 ते 25 मिनिट उशिराने सध्या रेल्वे धावत आहे. त्यामुळे प्रवाशांचे संध्याकाळीही घरी जाताना चांगलेच हाल होताना दिसत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मध्य रेल्वे विस्कळीत, एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकल उशिराने
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement