Blinkit च्या डिलिव्हरी बॉयचा भर चौकात मर्डर, धडाधड गोळ्या चालवल्या, शहरात खळबळ

Last Updated:

ब्लिंकिटच्या 25 वर्षीय डिलिव्हरी बॉयची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. राज कृष्णा असे पीडित तरुणाचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Blinkit च्या डिलिव्हरी बॉयचा भर चौकात मर्डर, धडाधड गोळ्या चालवल्या, शहरात खळबळ (AI Image)
Blinkit च्या डिलिव्हरी बॉयचा भर चौकात मर्डर, धडाधड गोळ्या चालवल्या, शहरात खळबळ (AI Image)
ब्लिंकिटच्या 25 वर्षीय डिलिव्हरी बॉयची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. राज कृष्णा असे पीडित तरुणाचे नाव असून, त्याच्यावर सरिताबाद वळणावर हल्ला करण्यात आला यानंतर त्याला मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी डिलिव्हरी बॉयला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
डिलिव्हरी बॉय करणाऱ्या तरुणांमध्ये काही वाद झाल्यामुळे हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 'डिलिव्हरी करणाऱ्यांमध्ये काही वाद झाले. यात एका डिलिव्हरी बॉयला गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एफआयआर नोंदवण्यात येत आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वैयक्तिक वादामुळे ही हत्या करण्यात आली, का यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
advertisement
advertisement
मृत्यू झालेला डिलिव्हरी बॉय हा अविवाहित होता. तसंच काही दिवसांपूर्वीच तो पाटण्यामध्ये राहायला आला होता. पाटण्यामध्येच त्याने भाड्याने घर घेतलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
advertisement

डिलिव्हरी बॉयला मारहाण

याआधी काहीच दिवसांपूर्वी ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयला बजंरग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार गाझियाबादमध्ये घडला होता, ज्याचा व्हिडिओही समोर आला. श्रावण महिन्यात मांसाची डिलिव्हरी करत असल्यामुळे डिलिव्हरी बॉयवर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला, तसंच त्याच्याकडून ज्या ठिकाणी डिलिव्हरी करायची आहे, त्याचा नंबरही घेतला. या नंबरवर कार्यकर्त्यांनी फोन करून महिलेला शिवीगाळही केली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी मनोज वर्मा याला अटकही करण्यात आली.
मराठी बातम्या/क्राइम/
Blinkit च्या डिलिव्हरी बॉयचा भर चौकात मर्डर, धडाधड गोळ्या चालवल्या, शहरात खळबळ
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement