'त्या' 3 बैलांना कुणी मारलं, बिबट्यानं की वाघानं? वन विभाग आहे कन्फूज, शेतकऱ्यांना भरलीय धडकी!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून तुळजापूर तालुक्यात एका हिंस्त्र प्राण्याने चांगलीच दहशत माजवली आहे. अचानक येतोय, गोठ्यातील जनावरांचा फडशा पाडतोय आणि...
तुळजापूर : गेल्या काही दिवसांपासून तुळजापूर तालुक्यात एका हिंस्त्र प्राण्याने चांगलीच दहशत माजवली आहे. अचानक येतोय, गोठ्यातील जनावरांचा फडशा पाडतोय आणि निघून जातो. पण तो हिंस्त्र प्राणी नेमका कोणता आहे, हे मात्र अजुनही कोणला कळलेलं नाही. कोणी म्हणतंय तो बिबट्या आहे, तर कोणी म्हणतंय तो वाघ आहे. काही शेतकऱ्यांनी वाघाची डळकारी ऐकलाच्या दावाही केलेला आहे.
3 बैलांचा पाडला फडशा, पण कुठल्या प्राण्याने?
सविस्तर वृत्त असं की, तुळजापूर तालुक्यात महादेव आणि आबासाहेब गंधुरे या दोन सख्ख्या भावांना मोठ्या नुकसानीस सामोरं जावं लागलं आहे. याचं कारण तो अज्ञात हिंस्त्र प्राणी. त्याने दोन्ही भावांचा 2 बैलांचा फडशा पाडलेला आहे. तर एक बैल गंभीर जखमी आहे, या घटनांमुळे परिसरात चांगलीच भीती पसरली आहे.
advertisement
वन विभागालाही सांगता येईना...
'तो प्राणी कोण', या प्रश्नाचं उत्तर वन विभागालाही देता आलेलं नाही. अधिकारी म्हणतात की, पावसामुळे चिखल झालेला आहे. त्यात प्राण्याच्या पाऊल खुणा व्यवस्थित दिसत नाहीत. त्यामुळे ओळखता येणं कठीण आहे. सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. पण, हा प्राणी बिबट्या आहे की, वाघ हे सध्या सांगता येणार नाही.
advertisement
अशा घडल्या घटना
अमृतवाडी येथील महादेव गुंधरे यांचा 3 वर्षांचा बैल होता. शुक्रवारी या अज्ञान प्राणी त्याचा फडशा पाडला. ही घटना नुकतीच घडली असताना, शनिवारी महादेव यांचा भाऊ आबासाहेब गंधुरे हे शेतात जनावरांचं दूध काढण्यासाठी गेले असता, त्यांना त्यांच्या 4 वर्षांच्या बैलावर पुन्हा अज्ञान प्राण्याने हल्ला केल्याचं लक्षात आलं. त्यांनी आरडाओरडा केला, तेवढा तो प्राणी पळून गेला. या घटनेत एक बैल जखमी झाला, तर दुसरा मृत्यूमुखी पडला.
advertisement
हे ही वाचा : Ladki Bahin scheme : 'लाडकी बहीण' योजनेत मोठा घोटाळा, राज्य सरकारला 162 कोटींचा चुना, RTI मधून धक्कादायक माहिती समोर!
हे ही वाचा : तुमच्याकडेही आहेत 2 मतदान ओळखपत्र? सावधान! नाहीतर जावं लागेल थेट तुरुंगात; असेल तर काय कराल?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 12:07 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
'त्या' 3 बैलांना कुणी मारलं, बिबट्यानं की वाघानं? वन विभाग आहे कन्फूज, शेतकऱ्यांना भरलीय धडकी!


