Ladki Bahin scheme : 'लाडकी बहीण' योजनेत मोठा घोटाळा, राज्य सरकारला 162 कोटींचा चुना, RTI मधून धक्कादायक माहिती समोर!

Last Updated:

RTI information on Ladki Bahin scheme : लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांमुळे राज्य सरकारला 162 कोटी रुपयांचा चुना लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारा हजार अपात्र पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं माहिती अधिकारातून देखील समोर आलंय.

Ladki Bahin scheme
Ladki Bahin scheme
Ladaki Bahin Yojana fruad : राज्य सरकारची महत्त्वकांशी लाडकी बहिण योजना यशस्वी ठरल्याचं विधानसभा निवडणुकीत दिसून आलं होतं. राज्यातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. मात्र, अनेकांनी याचा चुकीच्या मार्गाने लाभ घेतल्याचं देखील समोर आलं आहे. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आलीये. 'लाडकी बहीण' योजनेतून तब्बल 90,411 अपात्र लाभार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारला 162 कोटी रुपयांचा फटका दिल्याचे उघड झाले आहे.

सरकारला 162 कोटी रुपयांचा चुना

माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते अजय बोस यांना मिळालेल्या माहितीनुसार, या अपात्र लाभार्थ्यांमध्ये 12,431 पुरुष आणि 77,980 महिलांचा समावेश आहे. आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी या योजनेच्या अंमलबजावणीबद्दल माहिती मागवली होती. तेव्हा त्यांना ही आकडेवारी मिळाली. अपात्र लाभार्थ्यांमुळे महाराष्ट्र सरकारला 162 कोटी रुपयांचा चुना लागला आहे.
advertisement

आरटीआयच्या माहिती अधिकारात धक्कादायक माहिती

दरम्यान, 'लाडकी बहीण' योजना फक्त महिलांसाठी असताना, यामध्ये मोठ्या संख्येने पुरुष लाभार्थी आढळून आले आहेत. बोस यांनी या गैरव्यवहाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या गंभीर गैरव्यवहारानंतर आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी या सर्व अपात्र लाभार्थ्यांकडून मिळालेली रक्कम वसूल करण्याची आणि त्यांच्यावर तातडीने फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घोटाळ्यामुळे सरकारच्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचे दिसून येत आहे.
advertisement

लाडकी बहिण योजना

लाडकी बहिण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ठरावीक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या पैशांचा वापर त्या त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा बचत करण्यासाठी करू शकतात. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. यामुळे त्यांना कुटुंबातील निर्णयांमध्ये अधिक सहभाग घेता येतो आणि त्यांना समाजात अधिक सन्मानाने जगता येतं. पण अनेकांनी याचा गैरफायदा घेतल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ladki Bahin scheme : 'लाडकी बहीण' योजनेत मोठा घोटाळा, राज्य सरकारला 162 कोटींचा चुना, RTI मधून धक्कादायक माहिती समोर!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement