नेमकं काय घडलं?
अकोला जिल्ह्यातील एका खासगी शिकवणी क्लासेस विद्यार्थी आणि शिक्षकांसह काही सहकार्यांची सहल रायगड जिल्ह्यातील काशीद बीच परिसरात फिरण्यासाठी गेली होती. काल सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास समुद्राकाठी उतरले असता समुद्राच्या लाटेत वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत 60 वर्षाचे शिक्षक राम कुटे यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
तर आयुष बोबडे या 17 वर्षीय विद्यार्थीला वाचवण्यात यश आले असून तो सुखरूप आहे. तर आयुष रामटेके या 19 वर्षीय तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे. आयुष हा शिकवणी क्लासेसचा विद्यार्थी नसून शिक्षकांच्या घराशेजारील राहणारा तरुण होता, असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान, फिरण्यासाठी सोबत आलेले शिकवणी क्लासमधील केवळ तीन विद्यार्थी होते आणि तिन्ही सुखरूप असल्याचे शिकवणी क्लासेसच्या शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सदर घटना मुरुड पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याने मुरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले आणि पुढील तपास चालू आहे.
