समोर आलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर तोडून रोकड काढून नेली. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यांनी वापरलेली साधने व पावलांचे ठसे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे..
advertisement
नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
धुळे–सोलापूर महामार्गालगत बीड शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर असलेल्या पाली गावात चोरट्यानी दरोडा टाकला आहे. कॅनरा बँकेत गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धाडस चोरी केली. बँकेच्या पाठीमागील असलेल्या भिंतीला गॅस कटरच्या सहाय्याने 16 इंच ड्रिल करण्यात आलं. या घटनेत अंदाजे अठरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्याने उलटे करून ठेवले यामुळे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले नसून चोरटे हे सराईत असल्याचे दिसत आहे. बँकेवर धाडसी दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोर नक्की कुठून आले?
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. संशयित वाहनाचा सध्या शोध घेतला जात आहे. चोर नक्की कुठून आले? जवळच्या परिसरातील ते आहेत का? बँकेत रात्रीच्या वेळी परिसरात कोणी नसत याचा त्यांना सुगावा होता का? या सगळ्या प्रश्नांचा शोध घेतला जात आहे. आता या प्रकरणात पोलीस आरोपींना कधी अटक करतात याकडे लक्ष आहे. काही दिवसांपूर्वीच बीड शहरात पंधरा लाखांच्या दरोड्याची घटना घडली होती, आणि आता पुन्हा अशाच प्रकारचा बँक दरोडा घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐकणीवर आला आहे.
हे ही वाचा :
