अपहरण कसं झालं?
पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, रोहित आर्याने माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी’ जाहिरात दिली होती आणि १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना मुंबईत बोलावले होते. या जाहिरातीनंतर १७ मुले गुरुवारी सकाळी स्टुडिओत पोहोचली. त्यांच्या पालकांनाही सोबत येण्याची परवानगी होती. मात्र, स्टुडिओत प्रवेश करताच रोहितने ‘शूटिंगदरम्यान अडथळा येईल’ या कारणावरून पालकांना बाहेर थांबण्यास सांगितले. केवळ एक ज्येष्ठ महिला पालक आत राहिली. त्यानंतर अपहरणाचा थरार सुरू झाला.
advertisement
मुलांचे हात-पाय बांधले
रोहितने काही मुलांचे हात-पाय बांधले, काहींना एका खोलीत कोंडून ठेवले आणि काहींच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. त्याने हे सर्व चित्रपटातील अपहरण दृश्यअसल्याचे मुलांना सांगितले. परंतु प्रत्यक्षात कोणतेही चित्रीकरण सुरू नव्हते. मुलांच्या मनात शंका आली अन आपलं खरच अपहरण होतंय हे लक्षात आलं.
मुलांनी आरडा ओरडा केला
पुढे जाऊन घाबरलेल्या मुलांनी जोरजोरात ओरडल्यावर इमारतीतील इतरांनी पोलिसांना कळवले. काही वेळातच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व १७ मुलांची सुटका करण्यात आली.
स्टुडिओ भाड्याने घेतला
प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे की, रोहितने ‘ओटीटी डॉक्युमेंटरी’ तयार करण्याच्या नावाखाली स्टुडिओ भाड्याने घेतला होता. मात्र, त्याचे प्रत्यक्ष उद्दिष्ट काय होते? याबाबत अद्याप संशय कायम आहे.
आज पहाटे पुण्यात अंत्यसंस्कार
आज शनिवारी पुण्यातील वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये पहाटे २:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईच्या जे जे रुग्णालयात त्याचं शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली यावेळी रोहित आर्याची पत्नी, मुलगा, मेव्हणा आणि इतर दोन नातेवाईक असे केवळ पाच जण उपस्थित होते.
