TRENDING:

घरी जाताना घात झाला, भररस्त्यात RSS च्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

Last Updated:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित RSS कार्यकर्ता घरी जात होता. याच वेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आरएसएसच्या कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला झालं. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस पथकं रवाना केली आहेत.

advertisement

नवीन अरोरा असं हत्या झालेल्या RSS च्या कार्यकर्त्याचं नाव आहे. ही घटना पंजाबमधील फिरोजपूरमध्ये घडली असून दोन अज्ञात हल्लेखोरांनी नवीन अरोरा यांची गोळ्या घालून हत्या केली. नवीन अरोरा (४०) आपल्या घरी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या खळबळजनक घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने तपास सुरू केला.

advertisement

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू

फिरोजपूरचे एसएसपी भूपिंदर सिंग आणि आमदार रणबीर सिंग भुल्लर हे देखील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हल्लेखोरांना लवकरच पकडण्याचे आश्वासन दिले. नवीन अरोराचे दिवंगत आजोबा दीनानाथ हे फिरोजपूर शहरात आरएसएसचे प्रमुख होते. नवीनचे वडील देखील संघाशी संबंधित आहेत. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज गोळा करत आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.

advertisement

नवीन यांचे वडील बलदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी नवीन हे आपल्या दुकानातून घरी निघाले होते. दरम्यान, दोन अज्ञात हल्लेखोरांनी नवीनवर हल्ला केला आणि त्यांच्यावर गोळीबार केला. नवीनचा जागीच मृत्यू झाला. नवीनला दोन लहान मुले आहेत. कुटुंबाने हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दागिने नाही तर... पुणेकर या लाख मोलाच्या वस्तू मोफत पाहता येणार, कधी आणि कुठं?
सर्व पहा

मराठी बातम्या/क्राइम/
घरी जाताना घात झाला, भररस्त्यात RSS च्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल