काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकलेल्या या डॉक्टरांनी अखेर मानसिक तणावाला कंटाळून स्वतःचा जीव घेतल्याची माहिती समोर येत आहे.
महिला डॉक्टर या काही दिवसांपासून वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादामुळे सतत चौकशीला सामोऱ्या जात असल्याची माहिती समोर आली होती. “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” अशी तक्रार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात दिल्याचे समजते. मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी काल उशिरा रात्री आत्महत्या केली.
advertisement
हातावर लिहिलेली सुसाईड नोट; गंभीर आरोप
घटनास्थळी तपासादरम्यान डॉक्टरांच्या हातावर लिहिलेली एक सुसाईड नोट आढळली. त्यात त्यांनी पोलिस PSI गोपाल बदने यांनी चार वेळा शारीरिक अत्याचार केल्याचा आणि प्रशांत बनकर यांने मानसिक छळ दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. बनकर हा महिला डॉक्टर राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा आहे. या खुलाशामुळे पोलिस यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
रुग्णालयात शोककळा, सहकाऱ्यांमध्ये संताप
घटनेनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयात शोककळा पसरली असून डॉक्टर व आरोग्य कर्मचारी मोठ्या धक्क्यात आहेत. सहकाऱ्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुढील तपास सुरू
स्थानिक पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. फलटणसह साताऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
