TRENDING:

मुंबईच्या गेस्ट हाऊसमध्ये अल्पवयीन मुलींचा सौदा, विदेशी ग्राहकांना हेरून सुरू होता धक्कादायक प्रकार

Last Updated:

Crime News: मुंबईच्या अंधेरी परिसरात सहार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथील एका गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईच्या अंधेरी परिसरात सहार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथील एका गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापेमारी करत एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. तसेच दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित आरोपी पीडित मुलीला पैशांचं आमिष दाखवून तिच्याकडून देहव्यापार करत होते. तिला विदेशी ग्राहकांकडे पाठवलं जात होतं. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीच्या मरोल नाका परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती सहार पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित गेस्ट हाऊसवर छापेमारी केली. छापेमारीत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीची सुटका केली. तसेच गेस्ट हाऊसचा मॅनेजर आणि त्याचा आणखी एक साथीदार असं दोघांना पोलिसांनी अटक केली. सलमान आणि जबरूल असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

advertisement

आरोपी सलमान आणि जबरुल हे आर्थिक चणचणीत असणाऱ्या तरुणींना हेरून त्यांना वेश्याव्यवसायात ओढलं होतं. विदेशी पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्यांना भाग पाडलं जात होतं. याप्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीची चौकशी केली असता, दोन्ही आरोपी पीडितांना विदेशी पुरुषांकडे पाठवायचे. संबंधित ग्राहकांनी दिलेल्या रकमेपैकी तुटपुंजी रक्कम या महिलांना दिली जायची. उर्वरित सगळे पैसे आरोपी आपल्याकडे ठेवायचे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 वर्षांपूर्वी लावलं डोक, शेतकरी करतोय आता फायद्याची शेती, वर्षाला लाखांत कमाई
सर्व पहा

सहार पोलिसांनी सेक्स रॅकेटमध्ये गुंतलेल्या अल्पवयीन मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिला बाल सुधारगृहात पाठवलं आहे. हे रॅकेट केवळ दोघांकडून नव्हे तर या प्रकरणात आणखीही काही लोक अडकलेले असू शकतात, असा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. शिवाय ज्या विदेशी नागरिकांकडे या मुलींना पाठवलं जात होतं, त्या विदेशी नागरिकांची ओळख पटवण्याचं कामही सहार पोलीस करत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
मुंबईच्या गेस्ट हाऊसमध्ये अल्पवयीन मुलींचा सौदा, विदेशी ग्राहकांना हेरून सुरू होता धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल