मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोलापूर-संभाजीनगर महामार्गावरील कावलदरा परिसरात घडली आहे. इथं पाच ते सहा जणांच्या टोळीने चारचाकी वाहनं अडवून प्रवाशांना मारहाण करत लूटलं आहे. गुरुवारी पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. आरोपींनी जवळपास 4 ते 5 गाड्यांना अडवून त्यातील महिला आणि पुरुष प्रवाशांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील सोने, मोबाईल आणि इतर वस्तू लुटून नेल्या आहेत.
advertisement
ज्या गाड्यांवर हल्ला झाला, त्या गाड्या धाराशिवसह बाहेरील जिल्ह्यातील आहेत. 5 ते 6 जणांच्या टोळीने ही लूट केली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. धावत्या वाहनासमोर काहीतरी टाकून टायर फोडण्यात आले. त्यानंतर वाहने थांबली की त्यांची लूट करण्यात आली. वाहनाची टायर फोडण्यात आल्याने अपघात होता होता वाचला. या घटनेने प्रवाशांत भीतीचे वातावरण आहे. यात काही प्रवासी जखमी आहेत त्यांना तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत
अशाप्रकारे रात्री अपरात्री वाहनांचं टायर फोडून गाडी रोखायची आणि अर्धवट झोपेत असलेल्या प्रवाशांना टार्गेट करून त्यांची लूटमार करायची, आरोपींच्या या चोरी करण्याच्या पद्धतीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशाप्रकारे टायर फोडून वाहनांना थांबवलं जात असल्याने मोठा अपघात होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.