सोलापूर : सोलापुरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. सोलापुरात एका 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना घडली होती आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून वडिलांचे आणि आजीचे अनैतिक संबंध पाहिल्याने वडिलांनीच पोटच्या मुलीचा खून करून तिला पुरल्याची धक्कादायक माहिती मुलीच्या आईने दिली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर गावातील धक्कादायक घटना घडली होती. शुक्रवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास कुसूर गावाच्या पोलिस पाटलांना गावात एका मुलीचा मृतदेह खड्यात पुरण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पाटील आणि प्रशासनाने घटनास्थळी जातं पाहणी केली होती. त्यावेळी घराच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात एका मुलीचा मृतदेह पुरून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता मुलीच्या आईनेच हा धक्कादयक प्रकार सांगितला आहे.
सोलापुरात 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर चौकशी केली असता मृत मुलीने वडिला आणि त्याची आई (मृत मुलीची आजी) या दोघांचे अनैतिक संबंध मुलीने पहिल्याने तीचा खून केला, असा आरोप मृत मुलीच्या आईनेच केला आहे. दरम्यान पोलिसांनी अद्याप मृत्यू की खून याबाबत शवविच्छेदन अहवाल न आल्याने कोणावरही कारवाई केली नाही.
मृत मुलीच्या आईचा गंभीर आरोप
मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलिस स्टेशनमध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र पोलिस पाटलांच्या प्रथम जबाबानुसार खून झालेल्या मुलीच्या वडिलांनीच मुलीचा खून केल्याची फिर्याद दिली आहे. माझ्या सासूचे आणि नवऱ्याचे अनैतिक संबंध मुलीने पाहिले होते त्यामुळे नवऱ्याने तिचा खून केला. मी तिला सोडवण्यासाठी गेले होते मात्र मलाही नवऱ्याने मारहाण केली असल्याचा आरोप मृत मुलीच्या आईने केलाय.
ही घटना नेमकी कधी घडली?
रुग्णालयाच्या अहवालत मुलीचा मृत्यू नैसर्गिक आहे की हत्या केली हे स्पष्ट होणार आहे. ही घटना नेमकी कधी घडली? यामध्ये कोण कोण सामील आहे? याबाबतची माहिती घेतली जात आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.