तौफीक महिबूब सय्यद असं गुन्हा दाखल झालेल्या २४ वर्षीय आरोपी प्रियकराचं नाव आहे. शनिवारी पहाटे त्याने अचानक आपल्या प्रेयसीला बेदम मारहाण केली. फोन का उचलत नाही, असा जाब विचारत आरोपीनं ही मारहाण केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यांना टोकदार लोखंडी वस्तूने प्रेयसीवर वार केले आहेत. या हल्ल्यात पीडित तरुणी जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
advertisement
प्रियकराने लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणीला अशाप्रकारे मारहाण केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी तौफीक विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खूनाच्या प्रयत्नासह इतर कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. प्रेयसी तरुणीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीवर प्रियकरानेच अशाप्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास सोलापूर एमआयडीसी पोलीस करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत जळगाव जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्याचारातून पीडित मुलीनं एका बाळाला जन्म दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीवर अत्याचार करणारा आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून पीडितेचा नातेवाईक आहे. अशोक बोरसे असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून कोर्टाने त्याला ९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.