सुदर्शन चोरगे असं हत्या झालेल्या 26 वर्षीय तरुणाचं नाव आहे. शनिवारी रात्री तो आपल्या एका मित्रासोबत पार्टी करण्यासाठी गेला होता. दोघांनी रिलॅक्स नावाच्या बारमध्ये मद्यपान केलं होतं. दारु प्यायल्यानंतर रात्री उशिरा दोघंही बारमधून बाहेर आले. बाहेर उभा राहून गप्पा मारत असताना दोघांमध्ये अचानक किरकोळ कारणातून वाद सुरू झाला.
दोघंही दारुच्या नशेत असल्याने हा वाद वाढत गेला. यावेळी आरोपीनं धारदार शस्त्राने सुदर्शनवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन सुदर्शन जागीच कोसळला. यावेळी घटनास्थळी असलेल्या काही नागरिकांनी तातडीने सुदर्शनला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्यांचा वाद नक्की कोणत्या कारणातून झाला? याचा शोध पोलीस घेत आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच आठवड्यात अशाप्रकारे दोन हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
