TRENDING:

अपघात की घातपात? 4 दिवसांत 2 घटना, ठाण्यात तरुणींचा धावत्या रेल्वेतून पडून होतोय संशयास्पद मृत्यू

Last Updated:

Crime in Railway: ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील तानशेत खर्डी रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील तानशेत खर्डी रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. रात्री १२ च्या सुमारास अशाप्रकारे तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे. मयत तरुणी नेमकी कोण आहे? ती कुठून आली होती? कुठे चालली होती? याबाबत कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांकडून तिची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
advertisement

अशाप्रकारे तरुणीचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याने आता विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. ४ दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे दहावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय एका मुलीचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला होता. चार दिवसांसात वाशिंद-खर्डी रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वेतून पडून 2 मुलींचा मृत्यू झाल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय.

18 फेब्रुवारी रोजी आकांक्षा दीपक जगताप नावाच्या 17 वर्षीय मुलीचा वाशिंद आसनगाव रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला होता. ती वेहलोळी फटक येथे सायंकाळी साधारण साडेसहाच्या आसपास रेल्वेतून पडली होती. विशेष म्हणजे आकांक्षा ही डोंबिवली येथील रहिवासी होती, ती इयत्ता दहावीत शिकत होती. सायंकाळी सहाच्या सुमारास तिने डोंबिवलीच्या दिशेनं प्रवास करणं अपेक्षित होतं. मात्र ती सायंकाळी 6 वाजता आसनगावच्या दिशेन प्रवास का करत होती? याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

advertisement

त्यामुळे आंकाक्षासोबत नक्की काय घडलं? या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित आहे. तिचा अपघात झाला? तिची हत्या झाली की तिने आत्महत्या केली? त्याचं कारण अजून समजलं नाही. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा चार दिवसात खर्डी तानशेत या स्टेशन दरम्यान रेल्वेतून पडून दुसऱ्या एका मुलीचा मृत्यू झाला आहे. संबंधित मुलीची अद्याप ओळख पटली नसून पोलीस तपास सुरू आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

मात्र अवघ्या चार दिवसात रेल्वेतून पडून दोन तरुणींचा एकाच प्रकारे मृत्यू झाल्याने संशय व्यक्त केला जात आहे. या मुलींनी आत्महत्या केली, की त्यांची हत्या करून रेल्वेतून टाकण्यात आलं आहे? याबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या/क्राइम/
अपघात की घातपात? 4 दिवसांत 2 घटना, ठाण्यात तरुणींचा धावत्या रेल्वेतून पडून होतोय संशयास्पद मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल