'पाच लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतोय...'
सविस्तर माहिती अशी की, अमरने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला होता. त्यात त्याने म्हटले होते, "मी पाच लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे." हा व्हिडीओ त्याने आपल्या आत्याच्या मुलाच्या मोबाईलवर पाठवला आणि सोबत आत्महत्येचे ठिकाण (लोकेशन) देखील पाठवले. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या कुटुंबीयांना विनंती केली होती की, "खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहा. माझ्या मोबाईलमध्ये यासंबंधीचे फोटो आणि रेकॉर्डिंग आहे." या व्हिडीओसोबत त्याने आपल्या मोबाईलचा पासवर्डही सांगितला होता.
advertisement
रात्रभर शोध, सकाळी आढळला मृतदेह
अमरने व्हिडीओ पाठवल्यानंतर त्याचे वडील, चुलते, चुलतभाऊ आणि नातेवाईक यांनी रात्रभर त्याचा शोध घेतला. मात्र, रात्री त्याचा मृतदेह सापडला नाही. रविवारी सकाळी पुन्हा शोधाशोध सुरू केली असता, अमरचा मृतदेह कडुलिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती पोलीस पाटील योगिता पवार यांनी तात्काळ तालुका पोलिसांना कळवली.
अमर हा वाहनचालक म्हणून एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याचा अवघ्या दोन महिन्यांपूर्वी, म्हणजे 6 जून रोजी पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील मुलीशी विवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत अमरने आत्महत्या केल्यामुळे नान्नज आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, अमरला त्रास देणारे ते पाच लोक कोण होते, याचा शोध घेतला जात आहे.
हे ही वाचा : Amravati News: नवऱ्याचं बाहेर लफडं, तरीही 'ती'ला दमदाटी; म्हणे, "चुपचाप संसार कर, नाहीतर..."
हे ही वाचा : पतीला बेदम मारहाण, पत्नीचं दिवसाढवळ्या अपहरण, पुण्याच्या खेडमधील धक्कादायक प्रकार
