Amravati News: नवऱ्याचं बाहेर लफडं, तरीही 'ती'ला दमदाटी; म्हणे, "चुपचाप संसार कर, नाहीतर..."
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
अमरावतीत एका विवाहितेने आपला पती (धुळे येथील) आणि सासरच्या मंडळींविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत कौटुंबिक छळाची तक्रार नोंदवली आहे. पतीचे दुसऱ्या महिलेशी...
अमरावती : नवऱ्याचे दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध असतानाही, तो आपल्यालाच हुकमत गाजवत 'चुपचाप संसार कर', असे बजावत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघडकीस आला आहे. एका विवाहितेने आपला पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध कौटुंबिक छळाची तक्रार येथील गाडगेनगर पोलिसांत शनिवारी (दि. 2 ऑगस्ट) नोंदविली. यातील पती हा धुळे येथील रहिवासी आहे.
सासरकडील पती व अन्य नातेवाईकांकडून होणारा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ सहनशक्तीपलीकडे गेल्याने या विवाहितेने अखेर माहेर गाठले आणि पोलिसांत धाव घेतली. गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी तपास सुरू आहे.
'आई-वडिलांच्या आग्रहास्तव लग्न केलं, तू मला आवडत नाहीस!'
गाडगेनगर हद्दीत राहणाऱ्या या तरुणीचे लग्न धुळे येथील एका तरुणाशी झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी पतीने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पतीचे बाहेर प्रेमप्रकरण असल्याची बाब लवकरच तिच्या लक्षात आली. त्यामुळे तो तिला सतत म्हणायचा, "मी तुझ्याशी केवळ आई-वडिलांच्या आग्रहाखातर लग्न केले आहे. मला तू आवडत नाहीस, मी नावापुरते लग्न केले आहे. तू कोणालाही काही सांगू नको, चुपचाप संसार कर." पतीच्या या बोलण्याने आणि त्याच्या प्रेमप्रकरणाने त्रस्त झालेल्या विवाहितेने याबाबत आपल्या सासरच्या मंडळींना सांगितले. मात्र, त्यांनीदेखील मुलाचीच बाजू घेतली आणि तिला पाठिंबा दिला नाही.
advertisement
हुंड्यासाठीही छळ, विवाहितेनी दिली तक्रार
एकीकडे पतीच्या प्रेमप्रकरणामुळे होणारा मानसिक छळ आणि दुसरीकडे सासरच्या मंडळींकडून होणारा हुंड्यासाठीचा त्रास, यामुळे ही विवाहिता पूर्णपणे खचली होती. हैदराबाद येथे सासर असलेल्या या विवाहितेने तिचा पतीसह सासरच्या अन्य मंडळींकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. तिने म्हटले आहे की, "हुंडा कमी दिला तसेच लग्नामध्ये आंदण दिलेले नाही, त्यासाठी आता माहेरून पैसे घेऊन ये," अशी मागणी करत तिचा कौटुंबिक छळ चालविला जात होता. या सर्व छळाला कंटाळून तिने अखेर अमरावतीतील माहेर गाठले आणि पोलिसांत तक्रार नोंदवून न्यायाची मागणी केली. या प्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 04, 2025 11:48 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Amravati News: नवऱ्याचं बाहेर लफडं, तरीही 'ती'ला दमदाटी; म्हणे, "चुपचाप संसार कर, नाहीतर..."










