देवदर्शनासाठी आला अन् अनर्थ घडला, बीडच्या सौताडा धबधब्यात आढळला तरुणाचा मृतदेह

Last Updated:

Beed News: बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या सौताडा येथील श्री क्षेत्र रामेश्वर धबधब्यात पोहत असताना एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या सौताडा येथील श्री क्षेत्र रामेश्वर धबधब्यात पोहत असताना एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संबंधित तरुण आपल्या काही मित्रांसह दुचाकीवरून रामेश्वराच्या दर्शनासाठी आला होता. पण देवदर्शन घेतल्यानंतर संबंधित तरुणासोबत अनर्थ घडला. तो सौताडा धबधब्यात पोहत असताना नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाला.
शंकर तळेकर असं मृत पावलेल्या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो बीड तालुक्यातील बहादुरपूर येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, शंकर तळेकर आपल्या काही मित्रांसोबत दुचाकीवरून सौताडा रामेश्वर येथे देव दर्शनासाठी आला होता. दर्शन झाल्यानंतर सर्व मित्र धबधब्याच्या ठिकाणी पोहण्यासाठी गेले. पोहत असताना शंकर पाण्याच्या खोल भागात गेला आणि त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत शंकर पाण्यात दिसेनासा झाला.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच सौताडा गावातील रामकिसन सानप आणि त्यांच्या मित्रांनी तातडीने शोधकार्य सुरू केलं. बराच वेळ शोध घेऊनही शंकर सापडला नाही. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर शंकरचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना खोल पाण्यात न जाण्याचं आवाहन केलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
देवदर्शनासाठी आला अन् अनर्थ घडला, बीडच्या सौताडा धबधब्यात आढळला तरुणाचा मृतदेह
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement