advertisement

वसईमध्ये मतदार यादीत घोळ, एकाच कुटुंबातील मतदारांसोबत भलतंच घडलं! कार्यकर्त्यांची तारांबळ

Last Updated:

Vasai Virar Election 2026 : वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीमध्ये घोळ समोर आला आहे. एकाच घरातील कुटुंबीयांना वेगवेगळ्या ठिकाणी विभागले असून मतदानाचा टक्का घसरणार असल्याचं चित्र समोर आलं आहे.

News18
News18
Vasai Virar Election 2026 : वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज मतदान होत आहे. मात्र या मतदानाच्या वेळी मतदार यादीतील घोळामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची दाट शक्यता आहे. एकाच घरातील कुटुंबीयांना वेगवेगळ्या ठिकाणी विभागल्याचं चित्र पहायला मिळालं. यामुळे मतदानावर मोठा परिणाम होणार का? असा सवाल विचारला जातोय. एकाच घरातील कुटुंबीयांना वेगवेगळ्या ठिकाणी विभागल्याने अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. वसईमध्ये मतदार यादीत घोळ सध्या चर्चेचा विषय आहे. त्यामुळे आता घरातून खेचून केंद्रावर आणणाऱ्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात असलेल्या 52 हजार दुबार मतदारांपैकी 29127 मतदारांच्या रहिवासाचा पत्ता महापालिकेच्या पथकांना सापडलाच नाही. तर 23252 मतदारांचा शोध पालिकेमार्फत घेण्यात आला आहे. यातील 5158 मतदारांकडून दुबार मतदान करण्यात येणार नाही, अशा आशयाचं हमीपत्र लिहून घेण्यात आलं आहे.
दरम्यान, वसई विरार महापालिका निवडणूक ही अंतिम टप्प्यात येऊन पोहचली, तेव्हा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध पोलीस ठाण्यांच्यामार्फत रूट मार्च काढण्यात आला होता. निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, याशिवाय नागरिकांनीही भयमुक्त वातावरणात मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला होता.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
वसईमध्ये मतदार यादीत घोळ, एकाच कुटुंबातील मतदारांसोबत भलतंच घडलं! कार्यकर्त्यांची तारांबळ
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement