बोगस डॉक्टरांना चाप! क्लिनिकमध्ये आता QR कोड बंधनकारक, 'स्कॅन' करताच कळणार खरा डॉक्टर!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
राज्यातील बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (MMC) 'Know Your Doctor' उपक्रम सुरू केला आहे. आता प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला...
गोंदिया : राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी आणि नागरिकांना खरा डॉक्टर ओळखता यावा, यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिषदेने राज्यातील सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना मेल पाठवून 'QR कोड' डाऊनलोड करून तो त्यांच्या क्लिनिकमध्ये नावाच्या पाटीसमोर लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा क्यूआर कोड स्कॅन करताच, डॉक्टर खरा आहे की बोगस, हे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना लगेच समजणार आहे.
'आपल्या डॉक्टरला ओळखा' - एक अनोखा उपक्रम
गेल्या अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांच्या तक्रारी येत आहेत. सर्वसामान्यांना बोगस डॉक्टर ओळखणे खूप अवघड असते. त्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली एक समिती गठीत केलेली असली तरी, बोगस डॉक्टरांची प्रकरणे उघडकीस येतच असतात. त्यामुळेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून "आपल्या डॉक्टरला ओळखा" (Know Your Doctor) हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
advertisement
नोंदणीकृत डॉक्टरला मिळेल QR कोड
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला एक विशिष्ट क्यूआर कोड दिला गेला आहे. त्यामध्ये डॉक्टरांची सर्व माहिती, त्यांचे शिक्षण आणि त्यांची नोंदणी क्रमांक उपलब्ध असेल. यासाठी गेल्या काही महिन्यांपासूनच काम सुरू होते आणि आता ते पूर्ण झाले आहे. सध्या 1 लाख 20 हजारांहून अधिक डॉक्टर हे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य आहेत. डॉक्टरच्या परवान्यांचे नूतनीकरण करणे आणि त्यांची अचूक माहिती उपलब्ध करून देण्याचे काम परिषद करते.
advertisement
'नो युवर डॉक्टर' प्रणाली कशी काम करेल?
राज्यात बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेता यावा, यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल - MMC) नोंदणीकृत डॉक्टरांना क्यूआर कोडचा वापर अनिवार्य केला आहे. यासाठी 'नो युवर डॉक्टर' (Know Your Doctor) या प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना डॉक्टरांची खरी ओळख, त्यांची पात्रता आणि परवान्याची माहिती मोबाईलवरच सहज मिळणार आहे.
advertisement
तपास घ्यायचा कसा?
MMC ने 11 फेब्रुवारी 2025 रोजी हे व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) सुरू केले होते. या प्रणालीद्वारे नागरिक क्यूआर कोड स्कॅन करून डॉक्टर नोंदणीकृत आहे का, त्यांची पात्रता आणि विशेष क्षेत्र कोणती आहेत, या बाबी तपासू शकतात. राज्यात सध्या 2 लाख नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक असूनही, यापूर्वी केवळ 10 हजार डॉक्टरांनीच या सिस्टममध्ये नावनोंदणी केली होती. आतापर्यंत ही नोंदणी ऐच्छिक होती, पण आता ती अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात अधिक पारदर्शकता येऊन बोगस डॉक्टरांना लगाम घालण्यास मोठी मदत होईल अशी अपेक्षा आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2025 11:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
बोगस डॉक्टरांना चाप! क्लिनिकमध्ये आता QR कोड बंधनकारक, 'स्कॅन' करताच कळणार खरा डॉक्टर!


