TRENDING:

बहिणीच्या छळाचा घेतला बदला! वाटेतच जावयाला गाठलं अन् सुपारी देऊन मेहुण्याने संपवलं, वाचा सविस्तर

Last Updated:

Amravati News : बहिणीला तिचा पती शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्यामुळे जावयावर मेहुण्याचा राग होता. एक दिवस जावयाला धडा शिकवायचा, असा...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Amravati News : बहिणीला तिचा पती शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्यामुळे जावयावर मेहुण्याचा राग होता. एक दिवस जावयाला धडा शिकवायचा, असा विचार मेहुण्याच्या डोक्यात आला. मेहुण्याने हा विचार मित्राला सांगितला. मित्राने एक व्यक्ती गाठून दिली आणि त्या व्यक्तीला जावयाच्या हत्येची सुपारी देण्यात आलाी. सौदा पाच लाखांत ठरला. आरोपींनी रेल्वे स्टेजनजवळ जावयाला गाठलं त्याचा खून केली.
Amravati News
Amravati News
advertisement

जावयाचा सुपारी देऊन मेहुण्याने केला खून 

सविस्तर वृत्त असं की, जावई अतुल पुरी मृत व्यक्तीचं नाव आहे. ते बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका विद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. अतुल पुरी 22 ऑगस्ट रोजी ते नेहमीप्रमाण दुचाकीने बारीपुरामार्गे ड्युटीवर जात होते. बडनेरा रेल्वे स्टेशनजवळ सकाळी 9 च्या सुमारास त्यांचा खून करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार अतुल पुरी हे त्यांच्या पत्नीला काही वर्षांपासून सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. त्यामुळे मेहुणा राहुल पुरी वैतागलेला होता. त्याने जावयाला चांगला धडा शिकवाचा असे ठरवले. त्याने मित्र प्रशांत वऱ्हाडे याला ही गोष्ट सांगितली. प्रशांत वऱ्हाडेने ओळखीतील अक्षय शिंपी याला मेहुणा राहुल पुरीने जावयाच्या हत्येची सुपारी दिली.

advertisement

5 लाखांची दिली होती हत्येची सुपारी

अक्षय आणि त्याचा मित्र गौरव कांबे या दोघांनी या कामाचे मेहुणा राहुल पुरी व प्रशांत वऱ्हाडे यांच्याकडून 5 लाख रुपये घेतले. त्यानंतर साहिल उर्फ गोलू, सक्षम आणि एक विधिसंघर्षित बालक या तिघांना 2 लाख रुपये प्रत्यक्षात देऊन अतुल पुरी यांना मारहाण करण्यास सांगितले. या कटातून रेल्वे स्टेशनवर अतुल पुरी यांना गाठत त्यांचा खून केला. या खून प्रकरणात मेहुणा राहुल पुरी, प्रशांत वऱ्हाडे (वय-42), गौरव गजानन कांबे (वय-29) यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. अक्षय प्रदीप शिंपी (वय-30) हा फरार झाला आहे. तर साहिल मोहोड (वय-19) आणि सक्षम लांडे, विधिसंघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

advertisement

हे ही वाचा : अनैतिक संबंधात पत्नी हैवान, प्रियकरासह त्याच्या 3 मित्रांच्या मदतीने पतीला संपवलं, रिक्षात कोंबून मंदिराजवळ नेलं अन्...

हे ही वाचा : Nashik News: बैलाने दिली धडक, पुतण्या पडला विहिरीत, वाचविण्यासाठी काकाने मारली उडी, पण...

मराठी बातम्या/क्राइम/
बहिणीच्या छळाचा घेतला बदला! वाटेतच जावयाला गाठलं अन् सुपारी देऊन मेहुण्याने संपवलं, वाचा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल