लक्ष्मण जाधव असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तो धाराशिव तालुक्यातील बावी येथे आपल्या दोन वर्षांचा मुलगा आणि पत्नीसह वास्तव्याला होता. मागील चार वर्षांपासून लक्ष्मण जाधव या तरुणाला ऑनलाइन गेमिंगचा नाद लागला होता. ऑनलाइन रमी गेमच्या आहारी जाऊन त्याने आपली कोट्यवधि रुपयांची जमीन विकली होती. तसेच राहती जागा देखील त्याने विकली.
advertisement
या प्रकरणी पोलिसांना तरुणाच्या घरातून चार रजिस्टर आणि महत्त्वाची कागदपत्रं मिळाली आहेत. यात जमीनीच्या व्यवहाराची नोंद आहे. सतत ऑनलाईन गेमच्या नादात पैसे गेल्याने लक्ष्मण जाधव नैराश्यात गेला होता. यातूनच त्याने पत्नी आणि मुलाची हत्या करून स्वत: आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी त्याने सगळ्यात आधी दोन वर्षांच्या मुलाला विष दिलं. यानंतर त्याने पत्नीला देखील विष देऊन मारलं. दोघांचा मृत्यू झाल्याची शाहनिशा केल्यानंतर त्याने स्वत: गळफास लावून आत्महत्या केली.
आता हे प्रकरण ऑनलाईन गेमच्या माध्यमातूनच घडलं की डमी गेम बनवून त्यांची कुणी फसवणूक केली. याचा तपास पोलीस करत आहेत. मयत लक्ष्मण जाधव यांच्या घरात पोलिसांना रजिस्टरमध्ये अनेक गेम आणि त्याचे व्यवहार केलेल्यांची नावं आढळली आहेत. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.