स्वतंत्र भारती आणि कंचन गिरी हे दाम्पत्य. ज्यांचं लग्न मार्च 2023 मध्ये झालं. 29 सप्टेंबरला स्वतंत्र आपलं मोबाईलचं दुकान बंद करून घरी परतत होता. रस्त्यातच त्याला बायकोचा फोन आला. तिने त्याला चॉकलेट आणायला सांगितलं जे तिचा मित्र वीरूकडे होतं. त्याच ठिकाणी वीरूचे दोन साथीदार गोविंद यादव आणि गामा बिंद घात लावून बसले होते. स्वतंत्र वीरूकडे चॉकलेट आणायला पोहोचताच दोघांनी त्याच्यावर गोळी झाडली आणि फरार झाले.
advertisement
Solapur News: मोबाईलसाठी हट्ट, परिस्थिीतीने आई-वडील हतबल; बारावीत शिकणाऱ्या आकाशचं टोकाचं पाऊल
या प्रकरणाच्या तपास करताना पोलिसांनी कंचनचा मोबाईलचा तपासला. तिच्या कॉल डिटेल्समधून धक्कादायक खुलासा झाला. वीरू हा कंचनचा प्रियकर होता. स्वतंत्रसोबत लग्नाआधीपासूच त्यांचे प्रेमसंबंध होते. कुटुंबाच्या दबावामुळे तिला स्वतंत्रसोबत लग्न करावं लागलं. त्यामुळे स्वतंत्र आणि कंचनचे लग्नानंतर संबंध काही फार चांगले नव्हते. त्यांच्यात सतत वाद होत होते. नवऱ्याला आपल्या मार्गातून हटवण्यासाठी कंचनने आपल्या प्रियकरासोबत प्लॅन केला. त्यानुसारच त्याची हत्या करण्यात आली.
पोलीस चौकशीत कंचनने आपला गुन्हा कबूलही केला. त्यानंतर तिने दिलेल्या माहितीनुसार गोविंद, गामाला अटक करण्यात आली आहे. तर वीरू अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं, असं वृत्त आज तकने दिलं आहे.