Solapur News: मोबाईलसाठी हट्ट, परिस्थितीने आई-वडील हतबल; बारावीत शिकणाऱ्या आकाशचं टोकाचं पाऊल
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Solapur News: आईवडिलांनी स्मार्टफोन घेऊन दिला नाही म्हणून एका बारावीच्या विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
सोलापूर, 2 ऑक्टोबर (प्रीतम पंडित, प्रतिनिधी) : स्मार्टफोनसाठी बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आई वडिलांकडे हट्ट केला. मात्र, मुलाचा हट्ट पूर्ण न झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. आकाश राजकुमार पुजारी (वय 18 रा. कुसुर तालुका दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने फोनसाठी गळफास घेत आपलं जीवन संपवलं. स्मार्टफोनसाठी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर येताच सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात याबाबत या फिर्याद देण्यात आली आहे..
आकाश पुजारी हा मंद्रूप येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिकत होता. तो आपल्या आई वडिलांना सतत मोबाईल घेऊन द्या, अशी मागणी करत होता. मात्र, आई वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी मोबाईल घेऊन दिला नव्हता. मोबाईल घेण्यावरून तो घरात आई-वडिलांशी वाद घालत होता. आई वडील एक स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नाही अशा विचाराने आकाश हा निराश झाला होता.
advertisement
गळफास घेत संपवले जीवन
मोबाइलवरून तो घरात सातत्याने आई-वडिलांशी वाद घालायचा. शनिवारी रात्री उशिराने तो घरी आला. आई-वडील झोपल्यानंतर त्याने घरापासून जवळच असलेल्या आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. रविवारी पहाटेपासून आई-वडिलांनी आकाशचा शोध घेतला असता तो शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती मंद्रुप पोलिसांना दिली. मंद्रुप पोलीस घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर आकाशचा मृतदेह खाली उतरविला. त्यानंतर मृतदेह मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. या घटनेची नोंद मंद्रूप पोलीस ठाण्यात झाली आहे.
Location :
Solapur,Solapur,Maharashtra
First Published :
October 02, 2023 10:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News: मोबाईलसाठी हट्ट, परिस्थितीने आई-वडील हतबल; बारावीत शिकणाऱ्या आकाशचं टोकाचं पाऊल