advertisement

Ashok Kharat Property: अशोक खरातची आणखी मालमत्ता उघड, नवी यादी समोर, तब्बल 500 कोटींचे प्लॉट्स

Last Updated:

 भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादी समोर आली आहे.  नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30 हून अधिक ठिकाणी प्लॉटस खरेदी केले असल्याचं उघड झालं आहे. 

News18
News18
नाशिक: महिलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे. अशोक खरातने केलेल्या काळ्या कृत्याचे रोज नव नवीन खुलासे होत आहे. एवढंच नाहीतर खरातने नाशिकमध्ये बक्कळ अशी मालमत्ता गोळा केली आहे. त्यामध्ये आता नाशिक आणि अहिल्यानगरमधील संपत्तीची भर पडली आहे. आणखी ३० ठिकाणी प्लॉट्स खरेदी केल्याचं समोर आलं आहे. तसंच, सिन्नरमध्ये अनेक दुकानांमध्येही गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे.
भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादी समोर आली आहे.  नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30 हून अधिक ठिकाणी प्लॉटस खरेदी केले असल्याचं उघड झालं आहे.  सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.  अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर संपत्ती असल्याचं यादी उघड झाली आहे.  या सर्व मालमत्ताची तपासणी होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं आहे.
advertisement
सिन्नरमध्ये हार्डवेअर दुकान
एवढंच नाहीतर सिन्नरमध्ये अशोक खरातने एका हार्डवेअर दुकानामध्ये गुंतवणूक केल्याचं उघड झालं आहे.  सिन्नर शिर्डी रस्त्यावर हार्डवेअरचं भव्य दुकान आहे.  शिवसंकल्प हार्डवेअर असं या दुकानाचं नाव आहे. हे  दुकान अशोक खरातच्या बायकोच्या नावावर आहे. हे दुकान त्याचा मेव्हणा सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे.
अशोक खरातची कुठे मालमत्ता
अशोक खरातने नाशिकमध्ये मोठी मालमत्ता गोळा केली होती.   सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव या परिसरात खरातने मोठी मालमत्ता जमवल्याची चर्चा आहे. शिर्डीतील ज्या भूखंडावर हा प्रकार घडला, तो जमिनीचा तुकडा अतिशय महागड्या ठिकाणी आहे. एका सामान्य ज्योतिषाकडे एवढी प्रचंड संपत्ती आली कुठून? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महिलांच्या शोषणातून आणि फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून ही 'माया' जमवली गेली असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Property: अशोक खरातची आणखी मालमत्ता उघड, नवी यादी समोर, तब्बल 500 कोटींचे प्लॉट्स
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement