advertisement

Right Way To Use Toilet : कमोडचं झाकण बंद करून फ्लश करावं की उघडं ठेऊन? 99% लोकांचा चुकतो अंदाज..

Last Updated:
Toilet Hygiene : हल्ली बहुतांश घरांमध्ये वेस्टर्न टॉयलेट असतात. आता प्ल्यालाकडे ती गोष्ट राहिलेली नाही. मात्र तरीही काही गोष्टी सर्वांनाच माहित नसतात. जसं की, टॉयलेट वापरल्यानंतर फ्लॅश करताना कमोडचं झाकण बंद करावं की उघडं ठेवावं.
1/7
टॉयलेट ही अशी जागा असते, जिथे आपण पूर्ण हायजिन मेंटेन केलं पाहिजे. या ठिकाणी योग्य ती स्वच्छता न पाळल्यास आपल्याला संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच हा प्रश्न देखील टाकताच महत्त्वाचा आहे की, टॉयलेट फ्लश करताना कमोडचं झाकण बंद करावं की उघड ठेवावं.

2/7
फ्लश करताना कमोडचं झाकण नेहमी बंद असावं, याबद्दल अनेक ठिकाणी सांगितलं गेलं आहे. तज्ज्ञांच्या मते, आपण ही सवय लावून घेली पाहिजे. बऱ्याचदा लोक वेस्टर्न टॉयलेट वापरल्यानंतर घाईगडबडीत तिथून जाण्यासाठी पटकन फ्लॅश करतात. यावेळी झाकण उघडंच असतं. पण ही पद्धत अतिशय चुकीची आहे.

3/7
आपण रोज टॉयलेट वापरतो. हा आपल्या दैनंदिन क्रियांचा एक भाग आहे. पण योग्य नियम न पाळल्यास हे धोकादायक ठरू शकतं. ही सवय वेळीच लावून घेतली नाही तर यामुळे आरोग्यावर कधीही संकट येऊ शकते.

4/7
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, कोलोरॅडो बोल्डर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले. या संशोधनात असं सांगितलं गेलं आहे की, फ्लश करताना टॉयलेटचे झाकण उघडे ठेवल्याने अनेक धोकादायक जीवाणू हवेच्या संपर्कात येतात. फ्लश केल्यानंतर, टॉयलेट हवेत एक प्रकारचे जेट तयार करते, जे कमोडमध्ये वरच्या पाच फुटांपर्यंत कण वाहून नेऊ शकते.

5/7
या कणांमध्ये जंतू, विषाणू आणि बॅक्टेरिया असतात, जे फक्त 8 सेकंदात तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. इतक्या कमी वेळेत हे हानिकारक जिवाणू तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. म्हणूनच तुम्हाला संसर्ग नको असेल, आजारपण टाळायचं असेल तर नेहमी कमोडचं झाकण बंद करून फ्लश करा.

6/7
शास्त्रज्ञांनी सांगितले की, हे द्रव थेंब उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. पण यामध्ये ई कोलाय, नोरोव्हायरस असे धोकादायक जंतू असतात. हे कण 6.6 फूट प्रति सेकंद वेगाने बाहेर पडतात आणि 1.5 मीटर उंचीपर्यंत उडू शकतात. हे नाकातील केसांमधून बाहेर पडून फुफ्फुसात खोलवर पोहोचू शकतात आणि यामुळे आजारपण येऊ शकते.

7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement