advertisement

बुवासोबत असलेली संगत महागात, रूपाली चाकणकरांना धक्का पक्का, हकालपट्टी होणार? तटकरेंची पोस्ट काय सांगते?

Last Updated:

नाशिक भोंदूबाबा प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू, असे सूचकपणे सांगत रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी होऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे दिले असल्याचे बोलले जाते.

रूपाली चाकणकर-सुनील तटकरे
रूपाली चाकणकर-सुनील तटकरे
मुंबई : स्वत:ला ज्योतिषशास्त्रातला तज्ज्ञ म्हणवून घेणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या गोरखधंद्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून त्याच्याशी जवळीक असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. खरात याच्या मंदिर देवस्थान ट्रस्टवर सदस्या असलेल्या चाकणकरांचे खरातसोबतचे अनेक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत असून त्यामुळे त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात खरातची चौकशी सुरू असल्याने रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद ठेवू नये, त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू, असे सूचकपणे सांगत रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी होऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत.
नाशिकच्या विकृत भोंदूच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरून गेलाय. बड्या बड्या नेत्यांचा गुरु असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या अनेक कारनाम्यांचा भांडाफोड होतो आहे. लोकांची कुंडली सांगणाऱ्या कॅप्टन खरात याच्या काळ्या कारनाम्यांची अख्खी कुंडलीच पोलिसांच्या हाती लागली आहे. अशोक खरात प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. दुसरीकडे खरात याच्याशी असलेली जवळीक चाकणकर यांना भोवणार असल्याचे चित्र आहे. कारण खरातचा गोरखधंदा उघडकीस आणणाऱ्या पत्रकारांना चाकणकरांनी धमकीचे फोन केल्याचे आरोप आहेत. तसेच चाकणकर यांचे खरात यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याचेही निष्पन्न झाल्याने त्यांची विकेट जाणार, अशी जोरदार चर्चा आहे.
advertisement

अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर सुनेत्रा पवार यांची भेट घेणार

खरात प्रकरणाच्या संदर्भाने आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी रुपाली चाकणकर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचे कळते आहे. तत्पूर्वी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

नाशिकच्या प्रकरणावर सुनील तटकरे काय म्हणाले आहेत?

नाशिकच्या खरात प्रकरणाच्या अनुषंगाने जी काही माहिती बाहेर येते आहे, ती उद्विग्न करणारी आहे. देवाच्या आणि श्रद्धेच्या नावाने अशा काही गोष्टी होतील अशी कल्पना मी किंवा कोणीच कधीही करू शकत नाही.
advertisement
advertisement
सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाचाच अनेक व्यक्तींशी तसेच संस्थांशी संपर्क येतो. अनेकदा या संपर्काचे स्वरूप थेट स्वरूपाचे असतेच असे नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, एखादे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातले जाईल. उलट या प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन पोलिसात तक्रार नोंदवावी. आमचे सरकार या प्रकरणात ठाम भूमिका घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू, असे सूचकपणे सुनील तटकरे म्हणाले. त्यांच्या पोस्टमधून चाकणकर यांचा राजीनामा होऊ शकतो, असे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बुवासोबत असलेली संगत महागात, रूपाली चाकणकरांना धक्का पक्का, हकालपट्टी होणार? तटकरेंची पोस्ट काय सांगते?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement