आगरा : सध्या अनैतिक संबंधांच्या अनेक घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पती पत्नीमधील वाद सोडवण्यासाठी आग्रा पोलीस लाइनमध्ये समुदेशन केले जाते. याठिकाणी पती-पत्नीमधील विविध प्रकारचे वाद समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे.
पतीने आपल्या पत्नीवर ती तिच्या प्रियकरासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचा आरोप केला आहे. मी घरी नसताना पत्नी माझ्यामागे आपल्या प्रियकरासोबत व्हिडिओ कॉलवर बोलते. मात्र, जेव्हा मी घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले तेव्हा तिने कॅमेऱ्यावर टॉवेल टाकून दिला, असे पतीने म्हटले आहे.
advertisement
या लोकांनी सोने अजिबात वापरू नये, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान, महत्त्वाची माहिती..
2022 मध्ये झाले लग्न -
समुपदेशक डॉ. सतीश खिरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरादत नगर पोलीस ठाणे हद्दीतील एका तरुणीचे 2022 मध्ये शमशाबाद पोलीस ठाणे हद्दीतील एका तरुणासोबत लग्न झाले होते. हा तरुण दिल्लीतील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. फोनवर बोलण्यावरुन पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण व्हायचे. मारहाणीच्या घटनेनंतर मागील 6 महिन्यांपासून पत्नी माहेरी राहत आहे. यानंतर आता तिने कुटुंब समुपदेशन केंद्राकडे आवाहन केले आहे.
शनिवारी दोन्ही पक्षांना तारखेवर बोलावण्यात आले. पत्नीने आरोप केला आहे की, पतीने वचन दिले होते की, तो लग्नानंतर तिला गावात नव्हे तर आग्रा येथे घर खरेदी करुन त्याठिकाणी ठेवेल. मात्र, असे झाले नाही. त्याने खर्चासाठी पैसेही दिले नाही. तसेच विचारणा केल्यावर मारहाण करायचा.
आता पिंपरी चिंचवडमध्येही मिळते चिझ मिसळ, किंमत किती, काय आहे यात असं स्पेशल?
पतीचा गंभीर आरोप -
तर पतीने गंभीर आरोप करताना म्हटले की, मी नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतो. मात्र, पत्नी जेव्हाही पाहिलं तेव्हा व्हिडिओ कॉलवर बोलत असते. घरातील कोणतेही काम करत नाही. तिला विचारणा केल्यावर भांडण करते. ती कुणासोबत बोलते हे जाणून घेण्यासाठी मी घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले. मात्र, तरीसुद्धा ती त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर टॉवेल टाकून फोनवर बोलत असते.
दरम्यान, समुपदेशनादरम्यान, पती आणि पत्नी दोघांना खूप समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तरीही हा विषय सुटला नाही. आता त्यांना पुढची तारीख देण्यात आली आहे.