लॉजमध्ये दोघांमध्ये भांडण झालं अन्....
मृत महिलेचे नाव दर्शिता आहे, दर्शिता हुनसूरच्या गेरासनहल्ली गावची रहिवासी होती. दर्शिताचे लग्न केरळमधील एका तरुणाशी झाले होते, परंतु तिचे स्थानिक तरुण सिद्धराजूशी प्रेमसंबंध होते. दोघेही सालिग्राम तालुक्यातील भेरिया गावातील एका लॉजमध्ये राहत होते. लॉजमध्ये दोघांमध्ये भांडण झालं, त्यानंतर संतप्त सिद्धराजूने दर्शिताच्या तोंडात स्फोटक पावडर ओतली.
advertisement
पोलिसांचा संशय बळावला
आरोपी प्रियकर आणि दर्शितामधील संबंधांबद्दल माहिती मिळाली आहे. फॉरेन्सिक टीम हत्येत वापरलेल्या पावडरची चौकशी करत आहे. या प्रकरणी सालीग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला, असा बनाव प्रियकराने रचला होता. मात्र, लॉज कर्मचारी तिथे पोहोचले तेव्हा खोलीत मोबाईल फोन आढळला नाही अन् पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी नव्याने चौकशी सुरू केली.
सिद्धराजने दिली गुन्ह्याची कबुली
दरम्यान, फोन खिडकीतून बाहेर फेकला फेकल्यातं आरोपीने सांगितलं. मात्र, पोलिसांना काहीही मिळालं नाही. पोलिस चौकशीदरम्यान आरोपी सिद्धराजने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. एफएसएल (फॉरेन्सिक तज्ञ) पथक तपासणी करत आहे. पोलिसांनी सांगितले की या संदर्भात सालिग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.