TRENDING:

40 वर्ष इंडस्ट्री गाजवली, 2 लग्न करून आला चर्चेत; बॉलिवूडचा भयानक व्हिलन पुण्याच्या रस्त्यांवर तळतोय वडे, VIDEO VIRAL

Last Updated:

एका मोठ्या स्टारचा तोरा बाजूला सारून पुण्याच्या रस्त्यावर एका गाडीवर वडापाव आणि भजी खाताना दिसत आहेत. त्यांचा हा अवतार पाहून पुणेकर त्यांचे चाहते झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आशिष विद्यार्थी हे त्यांच्या अभिनयासोबतच फूड व्लॉगिंगसाठी प्रचंड लोकप्रिय आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजत आहे, ज्यामध्ये ते एका मोठ्या स्टारचा तोरा बाजूला सारून पुण्याच्या रस्त्यावर एका गाडीवर वडापाव आणि भजी खाताना दिसत आहेत. आशिष विद्यार्थी यांचा हा अवतार पाहून पुणेकर त्यांचे चाहते झाले आहेत.
News18
News18
advertisement

आशिष विद्यार्थी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना काहीतरी अस्सल देसी खाण्याची इच्छा झाली. मग काय, त्यांनी थेट गाठला पुण्याचा प्रसिद्ध 'आदित्य वडापाव'. विशेष म्हणजे, ते या गाडीवर पहिल्यांदाच आले नव्हते.

'लोकांच्या भावनांशी कसं खेळायचं...', अंकिता वालावलकरने उघड केला सूरज चव्हाणचा मास्टरप्लॅन, सांगितल्या घरातल्या 'त्या' गोष्टी

advertisement

व्हिडिओमध्ये दिसतंय की, आशिष यांना पाहताच वडापाव विक्रेत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. विक्रेत्याने त्यांना आनंदाने सांगितलं की, "सर, तुम्ही मागच्या वेळी आले होतात तेव्हाचा फोटो मी माझ्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला होता!" यावर आशिष विद्यार्थी मोठ्या मनाने म्हणाले की, "मागच्या वेळी माझा व्हिडिओ कंटेंट थोडा खराब झाला होता, म्हणून मी मुद्दाम आज पुन्हा तुझ्याकडे वडापाव खायला आलो आहे."

advertisement

वडापावने जीभ भाजली अन्...

स्टॉलवर उभं राहून आशिष यांनी वडापाव, बटाटा भजी आणि कांदा भजीवर ताव मारला. गरम गरम वडापाव खाताना वाफेने त्यांची जीभ अचानक भाजली. आशिष यांची तगमग पाहून तिथे उभ्या असलेल्या एका काकूंनी त्यांना लगेच पुणेरी सल्ला दिला. त्या म्हणाल्या, "अहो सर, जरा फुंकून खा, नाहीतर तोंड भाजेल तुमचं." आशिष यांनीही हसत हसत त्यांचा सल्ला मानला आणि तिथल्या खमंग पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‘उद्यानाचा निधी खर्च होत नाही’, शिवप्रेंमींवर आली भीक मागण्याची वेळ, काय घडलं?
सर्व पहा

आशिष विद्यार्थी यांचा हा व्हिडिओ पाहून कुठेही असं जाणवत नाही की हा तोच माणूस आहे ज्याने पडद्यावर अनेक क्रूर खलनायक साकारले आहेत. एका सामान्य माणसाप्रमाणे रस्त्यावर उभं राहून, लोकांशी गप्पा मारत आणि पदार्थांचा आनंद घेत त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आशिष यांची पुण्यातील ही खाद्यभ्रमंती सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
40 वर्ष इंडस्ट्री गाजवली, 2 लग्न करून आला चर्चेत; बॉलिवूडचा भयानक व्हिलन पुण्याच्या रस्त्यांवर तळतोय वडे, VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल