जेव्हा बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळतात तेव्हा कोट्यवधींचा फटका बसतो. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनला निम्मे शेअर्स विकावे लागल्याचं समजताच प्रत्येकाला धक्का बसला. यावरून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत किती जोखीम असते हे स्पष्ट होते. काही वर्षांपूर्वी एक सीरियल प्रसारित होत होती. या सीरियलसाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता; पण सीरियलला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
advertisement
देशातल्या सर्वांत महागड्या टीव्ही शोबाबत बोलायचं झालं तर हा एक ऐतिहासिक एपिक शो होता. २०१७-१८ मध्ये त्याची निर्मिती झाली. या शोसाठी निर्मात्यांनी १००-२०० नाही, तर तब्बल ५०० कोटी रुपये खर्च केले होते. त्या तुलनेत या सीरियलला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा शो एका सीझनमध्येच बंद करावा लागला.
या सीरियलचं नाव 'पोरस' असं होतं. ती एक ऐतिहासिक एपिक ड्रामा सीरियल होती. देशातली सर्वांत महागडी टीव्ही सीरियल असा विक्रम या सीरियलच्या नावावर नोंदला गेला. 'फर्स्टपोस्ट'च्या वृत्तानुसार, २०१७ मध्ये निर्मात्यांनी या सीरियलसाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च केले होते.
'पोरस' ही सीरियल स्वस्तिक प्रॉडक्शनच्या सिद्धार्थ कुमार तिवारी यांनी प्रोड्यूस केली होती. ती सोनी टीव्ही चॅनेलवर प्रसारित झाली. सुरुवातीला या सीरियलला चांगला टीआरपी मिळाला. प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. नंतर तिचा टीआरपी घसरू लागला. बजेट पाहता, ही सीरियल प्रेक्षकांचं मन जिंकण्यात सपशेल अपयशी ठरल्याने ती फ्लॉप ठरली.
अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या तुलनेत 'पोरस'चं बजेट जास्त होतं. 'बाहुबली २'चं बजेट २५० कोटी, 'ब्रह्मास्त्र'चं बजेट ३५० कोटी, 'जवान' चित्रपटाचं बजेट ३०० कोटी तर 'सिंघम अगेन'चं बजेट ३५० कोटी रुपये होतं. 'पोरस'चं बजेट सुमारे ५०० कोटी रुपये होतं.
'पोरस' सीरियलमध्ये लक्ष्य ललवाणी प्रमुख भूमिकेत होता. लाछीची भूमिका सुहानीने साकारली होती. सिकंदरची भूमिका रोहित पुरोहितने साकारली होती. ही कथा पंजाब-सिंध प्रांताचा राजा पोरसवर आधारित होती. या राजाने सिकंदराशी युद्ध केलं होतं. आयएमडीबीवर या सीरियलला १० पैकी ७.६ रेटिंग मिळालं होतं.
'पोरस'ची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली गेली. निर्मात्यांना 'बाहुबली'सारखी सीरियल बनवायची होती. सीरियलमधल्या फाइट सीन्ससाठी महागड्या व्हीएफएक्सचा वापर केला गेला. मोठ्या युद्धाच्या दृश्यांसाठी हजारो लोकांना कास्ट केलं गेलं. तसंच याचं काम थायलंडसारख्या देशात केलं गेलं.
'पोरस'चे एकूण २९९ एपिसोड प्रसारित झाले. याचा अर्थ प्रत्येक एपिसोडसाठी १.७० कोटी रुपये खर्च केले गेले. 'सूर्यपुत्र कर्ण' ही 'पोरस'आधीची देशातली सर्वांत महागडी टीव्ही सीरियल होती. या सीरियलसाठी २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. 'पोरस' अखेरीस फ्लॉप ठरली.