TRENDING:

एक्स गर्लफ्रेंडचं लग्न होताच इमोशनल? फॅन्सच्या कमेंट्सवर भडकला मराठी अभिनेता, पोस्ट व्हायरल

Last Updated:

एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली.ज्याच्या चाहत्यांनी भलताच अर्थ लावला. अभिनेता फॅन्सवर चांगलाच भडकला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांच्या कामासंबंधी अनेक अपडेट ते शेअर करत असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ते शेअर करताना दिसतात. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच आतूर असतात. कलाकारही त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे जी पाहून त्याचे चाहते शॉक झालेत. या पोस्टचा चाहत्यांनी वेगळाच अर्थ लावला आहे. त्यांच्या कमेंटवर मराठी अभिनेता चांगलाच भडकला आहे.
News18
News18
advertisement

आपण बोलत आहोत मराठी अभिनेता आदिश वैद्यच्या पोस्टबद्दल. आदिशने आपल्या अधिकृत अकाउंटवर दोन फोटो शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये फक्त त्याचे हात दिसत आहेत. त्याने हातावर हात ठेवला असून एका हातात स्क्रन्ची (केस बांधण्यासाठीचा रबर) दिसत आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिलंय, "मेरे हाथ में. मेरा हाथ हो. सारी जन्नते मेरे साथ हो. स्वाइप लेफ्ट फॉर रिअलिटी."  दुसऱ्या फोटोमध्ये तो टेबलवर बसलेला दिसतो. त्याच्याबरोबर कोणी नाहीये.

advertisement

( Tejashri Pradhan : कोणत्या वयात लग्न करायचं! 30शी च्या आधी की 30शी नंतर? तेजश्री प्रधानचा खास सल्ला )

या कॅप्शनमुळे आणि हातात दिसणाऱ्या स्क्रन्चीमुळे चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. तर काहींनी या पोस्टचा संबंध त्याच्या एक्स गर्लफ्रेंडशी जोडला आहे. अभिनेत्री रेवती लेले ही आदिशची एक्स गर्लफ्रेंड आहे. तिचं नुकतंच लग्न पार पडलं आहे. तिच्या लग्नानंतर काही दिवसांतच आदिशने ही पोस्ट शेअर केल्यामुळे चाहत्यांच्या चर्चेला अधिकच उधाण आलं.

advertisement

पोस्टखाली अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली, "तू तिच्या लग्नानंतर फोटो शेअर का करतोय?" तर दुसऱ्याने लिहिलं, "दु:ख समझ सकता हू भाई का." आणखी एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हटलं, "त्याच्या गर्लफ्रेंडचं लग्न झालं ना… तू नक्कीच तिला मिस करत असणार."

advertisement

आदिश या कमेंट्सवर भडकला. एका फॅनला रिप्लाय देत त्याने लिहिलंय, "असा मुर्खासारखा प्रश्न तुम्हा का विचारत आहात. मी कोणाची खिल्ली उडवलेली नाही. हा जोक मी माझ्यावर केला आहे. तिला प्रेम मिळालं, ती आनंदी आहे. ज्याला कोणाला प्रेम मिळालं त्या सगळ्यांसाठी मी आनंदी आहे. पुढेच्या वेळेस बोलण्याआधी विचार करा."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata ची टँकसारखी EV, Toyota च्या धाकड SUV ला देते टक्कर, रेंजमध्ये कोण बेस्ट?
सर्व पहा

त्याची पोस्ट नेमकी कोणासाठी होती हे त्याने दुसऱ्या फोटोमध्ये स्पष्ट केलं आहे. मात्र चाहत्यांनी वेगळाच अर्थ काढला आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या प्रत्येक पोस्टचा बारकाईने अर्थ लावला जातो हे पुन्हा एकदा दिसून आलं.

मराठी बातम्या/मनोरंजन/
एक्स गर्लफ्रेंडचं लग्न होताच इमोशनल? फॅन्सच्या कमेंट्सवर भडकला मराठी अभिनेता, पोस्ट व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल