“द ग्रेट इंडियन कपिल शो” मध्ये नुकतेच गोविंदा, शक्ति कपूर आणि चंकी पांडे सहभागी झाले होते. यावेळी चंकी पांडेने गोविंदाविषयी अनेक खुलासे केले. चंकी पांडे आणि गोविंदा यांनी एकत्र एका सिनेमात काम केलं होतं. ज्याचं नाव होतं “आंखें”. या सिनेमात दोघे हिरो होते. खरंतर दोघे नाही तर तिघे हिरो होते. गोविंदा, चंकी आणि एक माकड.
advertisement
( 38 वर्षांच्या अभिनेत्रीचा 49 वर्षाच्या बाबासोबत रोमान्स, लग्नाच्या 1 महिन्यातच बेडरूममधला VIDEO समोर )
शक्ति कपूर म्हणाले, “त्या सिनेमात तीन हिरो होते. गोविंदा, चंकी आणि ते माकड.” त्यावर चंकी पांडे म्हणाला, “हो त्या माकडाला आमच्यापेक्षा जास्त फी मिळाली होती.” यावर गोविंदाने देखील सहमती दाखवली. गोविंदा म्हणाला, “आम्हाला पैसेच मिळाले नव्हते.”
यावर शक्ति कपूर यांनी सांगितलं. “त्या माकडाला मुंबईतील Sun n Sand या लग्झरी हॉटेलच्या एका महागड्या खोलीत ठेवलं होतं. डेविड मंकीला बोलवायचे तेव्हा चंकी यायचा आणि चंकीला बोलावलं की मंकी यायचा,” असं म्हणत शक्ति कपूर यांनी चांगलीच खिल्ली उडवली.
“आंखें” या सिनेमात गोविंदा, चंकी पांडे, कादर खान, राज बब्बर, शक्ति कपूर, बिंदू, शिल्पा शिरोडकर, सदाशिव अमरापूरकर सारखी तगडी स्टारकास्ट होती. 2 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने 18.84 कोटींची कमाई केली होती.