सोशल मीडियावर विशेषत: युट्यूबवर कलाकारांच्या आयुष्याबद्दल अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. त्यातही कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देणारे अनेक व्हिडीओ असतात. अशातच प्रसिद्ध अभिनेते अभिजीत चव्हाण यांचं निधन झाल्याची माहिती देणारा एक व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ पाहून अभिजीत चव्हाण चांगलेच संतापले. त्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत नाराजी व्यक्त केली.
advertisement
प्रिया मराठेनंतर आणखीन एका मराठी अभिनेत्याचे निधन. मराठी निसृष्टीने दोन कलाकार गमवले, असं थमलेन असलेला व्हिडीओ अभिजीत चव्हाण यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलंय, "माझ्या मृत्यूची बातमी मला पाहायला मिळाली. अजून काय पाहिजे. आता काय करायचं ह्यांचं?"
अभिजीत चव्हाण यांनी पोस्ट शेअर केल्यानंतर त्याखाली त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत लिहिलंय, "केस करायला हवी त्या शिवाय ही लोक सुधारणार नाहीत." दुसऱ्यानं लिहिलंय, "कारवाई करा.. आणि तुझं आयुष्य वाढलं बाबा." आणखी एकाने लिहिलंय, "देवा
काय मूर्ख माणसं आहेत. जिवंत माणसाला मारतात."
अभिजीत चव्हाण यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, त्यांचा 'इन्स्पेक्टर झेंडे' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात एका गाण्यामध्ये त्यांची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुंदर मी होणार या नाटकात ते संस्थानिक महाराज ही भूमिका साकारत आहेत.