अभिजित सावंतने आपल्या स्वप्नातील कार घरी आणत सण अधिक खास केला. अभिजितने यंदाच्या गुढीपाडव्याला नवीन BMW कार खरेदी केली असून त्याने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
अभिजितने BMW X7 ही लक्झरी कार खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. या कारची किंमत जवळपास 1 कोटी 26 लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन कार घेऊन आनंद द्विगुणीत केला.
advertisement
गुढीपाडवा म्हणजे नव्या वर्षाची आणि नव्या सुरुवातीची चाहूल. याच खास दिवशी अभिजितने आपल्या स्वप्नातील कार घरी आणत सण अधिक खास केला. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. नवीन कार खरेदी करण्यासाठी अभिजीत आपल्या पत्नी आणि दोन मुलींसोबत कार शोरूममध्ये गेला होता. नवीन कार पाहून दोन्ही मुली खूप आनंदित झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतो. अभिजित स्वतःही या क्षणी खूप आनंदी आणि उत्साही दिसत आहे.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची पत्नी नव्या गाडीची पूजा करताना दिसते. अभिजितनं व्हिडीओ शेअर करत पोस्टमध्ये लिहिलंय, "नवीन सुरुवात, नवीन आशीर्वाद आणि या गुढीपाडव्याला नवी सवारी. यासाठी मनापासून कृतज्ञ आहे." त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीच अभिजितने आपल्या कुटुंबासोबत या नव्या कारमधून फॅमिली राइडलाही गेल्याचं दिसलं.
अभिजित सावंतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याचं तब्बल 13 वर्षांनंतर त्याचं मराठी सिनेमात गाणं रिलीज झालं आहे. 'सखे ग साजणी' हे त्याचं नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधी तो गौतमी पाटिलसोबत 'रुपेरी वाळूत' या रिक्रिएट गाण्यातही दिसला होता. या गाण्यालाही प्रेक्षकांनी पसंती दिली होती.
