TRENDING:

गश्मीर महाजनीचा 'गोंधळ'! पण शूटनंतर वाईट अवस्था, पूजा सावंतने सांगितला अंगावर येणारा प्रसंग

Last Updated:

'सालबर्डी' सिनेमातील गोंधळ शूट केल्यानंतर गश्मीर महाजनीची खूप वाईट अवस्था झाली होती. अभिनेत्री पूजा सावंतने याबद्दल सांगितलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सालबर्डी या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सिनेमातील एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सालबर्डी या मराठी चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी दमदार गोंधळी साकारताना दिसणार आहे. या गोंधळ नृत्यात गश्मीरने पारंपरिक वेशभूषा, प्रभावी देहबोलीसह कमालीचा नृत्याविष्कार सादर केला आहे. हा गोंधळ नुकताच रिलीज झाला आहे.
News18
News18
advertisement

हा गोंधळ शूट करताना अभिनेता गश्मीर महाजनीची खूप वाईट अवस्था झाली होती. पण कलेवरचं प्रेम यासमोर शून्य ठरलं. अभिनेत्री पूजा सावंतने या गाण्यानंतर गश्मीरची काय अवस्था झाली होती याबद्दल सांगितलं.

( छोट्या डॉनचं मोठं प्लॅनिंग! BBM 6 मधून बाहेर पडल्यावर काय करणार? प्रभू शेळकेने सगळं सांगितलं )

पूजा सावंत म्हणाली, "एक देवीचा गोंधळ आहे त्यासाठी नाव सुचवा असं मला विचारण्यात आलं. इतका अप्रतिम गोंधळ होता. मी अर्धवट ते गाणं थांबवलं आणि म्हटलं, सर मी आता गश्मीर महाजनीला फोन करतेय. मला दुसरं कोणीच सुचत नाहीये. योगायोग असतो, प्रत्येक गाण्याचं, कलाकाराचं नशीब आहे."

advertisement

"मी लगेच त्याला फोन केला. तो त्याच्या घरी होता. गश्मीर म्हणाला, गाणं पाठव दिग्दर्शक फ्री असतील तर भेटायला पाठव. सर त्याला भेटायला गेले. त्यांची मिटिंग झाली. त्याने हो म्हटलं आणि गश्मीरने गाणं केलं."

पूजा पुढे म्हणाली, "गाण्याचं शूट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गश्मीर महाजनीच्या बायकोने म्हणजेच गौरीने मला एक फोटो पाठवला. मी मोबाईलमध्ये फोटो पाहिला. त्याच्या तळपायाचा फोटो होता. तळपायाची संपूर्ण त्वचा निघाली होता. रक्त येत होतं.त्याला बँडेज लावून तो त्याच्या टेरेसवर बसला होता. हे कदाचित तो सांगणार नाही. पण मैत्रीण म्हणून हे सांगतेय."

advertisement

गीतकार मुकुंद भालेराव यांच्या लेखणीतून सजलेल्या या गोंधळाला संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचा संगीतसाज आहे. अजय गोगावले यांचा दमदार स्वर गाण्याला लाभला आहे. हा गोंधळ आशिष पाटील यांनी आपल्या सदाबहार अदाकारीने नृत्यदिग्दर्शित केला आहे.

गावातील गूढ शांततेच्या आड दडलेलं जीवघेणं रहस्य उलगडण्यासाठी हा गोंधळी येतोय का? अशा प्रश्नांची उत्सुकता यामुळे निर्माण झाली आहे. याबद्दल बोलताना गश्मीर महाजनी म्हणाला, "गोंधळ ही केवळ परंपरा नाही, तर देवीभक्तीची एक ऊर्जादायी अभिव्यक्ती आहे’. ‘सालबर्डी’मधील माझा गोंधळी हा कथानकाला वेगळी दिशा देणारा महत्त्वाचा दुवा आहे. गोंधळ गीतामध्ये असलेली ऊर्जा, नाद आणि पारंपरिक वातावरण यामुळे शूटिंग करतानाच अंगावर रोमांच उभे राहत होते. प्रेक्षकांनाही हा अनुभव नक्कीच जाणवेल."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

'सालबर्डी' सिनेमात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी अशी तगड्या कलाकारांची फौज आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
गश्मीर महाजनीचा 'गोंधळ'! पण शूटनंतर वाईट अवस्था, पूजा सावंतने सांगितला अंगावर येणारा प्रसंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल