बरेलीतील तिच्या घरावर गोळीबारात मारले गेलेले गोळीबार करणारे कुख्यात गुंड गोल्डी ब्रार आणि रोहित गोदार टोळीचे सक्रिय सदस्य होते. त्या प्रत्येकावर १ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. या घटनेतील महत्त्वाची बाब म्हणजे, आरोपींची ओळख त्यांच्या "लाल बुटांनी" झाली. खरंतर, गोळीबारानंतर बरेली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. दोन गुन्हेगार स्पोर्ट्स बाईकवर परदेशी पिस्तूल घेऊन आले होते, त्यापैकी एकाने लाल बूट घातला होता.
advertisement
'लाल बूट' अन् एन्काऊंटर
सीसीटीव्ही फुटेजनुसार, दुचाकीवरून मागे बसलेल्या व्यक्तीने गोळीबार केला होता. पोलिसांनी फुटेज बारकाईने तपासले तेव्हा त्यांना आढळलं की, गोळीबार करणाऱ्याने लाल बूट घातले होते. शिवाय, गुन्हेगारांचे स्वरूप आणि कपडे बरेलीच्या आसपासचे असल्याचे दिसून आले नाही. पण, यूपी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ), दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि हरियाणा स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांनी आता दोन्ही गुन्हेगारांना एका चकमकीत मारलं आहे. चकमकीत मारला गेलेला गुन्हेगार रवींद्र लाल बूट घालत होता, जो त्याच्यासाठी घातक ठरला.
संध्याकाळी ७:२२ वाजता झाला एन्काऊंटर
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) बुधवारी संध्याकाळी गाझियाबादच्या टेक्नो सिटी परिसरात तपासणी करत होते. या घटनेदरम्यान त्यांना माहिती मिळाली की दोन संशयित दुचाकीवरून येत आहेत, त्यापैकी एकाने लाल रंगाचे बूट घातले होते. त्यानंतर एसटीएफ अधिक सतर्क झाले. यादरम्यान, दोन मुले दुचाकीवरून येताना दिसली, ज्यांना एसटीएफने थांबण्याचा इशारा केला. त्यानंतर त्यांनी गोळीबार सुरू केला आणि पळून जाऊ लागले. संध्याकाळी ७:२२ वाजता पोलिसांनी स्वतःला वाचवण्यासाठी गुन्हेगारांवर गोळीबार केला.
गोळी लागल्याने दोन्ही गुन्हेगार जखमी
पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात अरुण आणि रवींद्र जखमी झाले होते, दोघांना पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी दोन्ही गुन्हेगारांकडून एक जिगाना पिस्तुल आणि काडतुसे जप्त केली आहेत. एक पांढरी अपाचे बाईक सापडली आहे. एसटीएफच्या मते, दोन्ही गुन्हेगार सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करताना अरुणने पांढरा शर्ट घातला होता, तर रवींद्रने निळा टी-शर्ट आणि लाल बूट घातले होते. दोघेही व्यावसायिक शूटर असल्याचे सांगण्यात आले.