निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकरच्या भांडणात निक्कीने ज्या प्रकारे वर्षाताईंना बोललं ते चुकीचं असल्याचं सगळेजण बोलत आहेत. वयाचा मान ठेवून बोलायचं तर तू उद्धटपणे बोललीस, असं बोललं गेलं. मात्र मिरा जगन्नाथने याविषयी वेगळं मत मांडलं. तिनं 'तुमचं वय घरी ठेवून या' म्हणत पोस्ट शेअर केली. मिरा जगन्नाथ नेमकं काय म्हणाली?
advertisement
मिराने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत बिग बॉस मराठी 5 च्या भांडणावर मत व्यक्त केलं. खास करुन निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यावर. मिरा म्हणाली, 'इथे कोणीही मान अपमानाची अपेक्षा ठेवू नये. बिग बॉसच्या घरात कोणीही मोठा कलाकार किंवा छोटा कलाकार नसतो. आणि तुमचं वय घरी ठेवून या.'
पोस्टच्या शेवटी मीराने असंही लिहिलं की, 'हे माझं मत आहे ज्यांना पटत नसेल त्यांनी मला मेसेज करु नये.' मीराच्या स्टोरीचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, यंदाचा सीझन नव्या होस्टसह नव्या फॉरमॅटमध्ये आहे. घरात वेगवेगळ्या कॅटेगरीतले स्पर्धक आले आहेत. सर्वच एकापेक्षा एक वरचढ आहे. विकेंड असल्यामुळे रितेश देशमुख स्पर्धकांनी भाऊचा धक्का देत आठवड्याभरात झालेल्या गोष्टींवरुन क्लास घेत आहे.